
शिवभोजन केंद्रावर अक्षय तृतीया निमित्त मोफत जिलेबी वाटप
शिवभोजन केंद्रावर अक्षय तृतीया निमित्त मोफत जिलेबी वाटप.
शिवभोजन थाळी लाभार्थ्यांमध्ये आनंद.
यावल (सुरेश पाटील): यावल येथील मिनीडोर रिक्षा स्टॉप जवळील शिवशक्ती महीला बचत गट संचालित शिवभोजन केंद्रात शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मसोहळ्या निमित्त व अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गरीब व गरजू व्यक्ती तसेच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मजूर,स्थलांतरित,बेघर तसेच बाहेर गावचे विद्यार्थी,इत्यादींनी शहरातील शिवभोजन केंद्रावर सर्व नियमांचे पालन करीत मास्क, सॅनीटायझर व सोशल distances चे पालन करून पार्सल स्वरूपात मोफत शिवभोजन थाळी सोबत जिलेबीचा आस्वाद घेतला व आनंद व्यक्त केला तसेच शिवभोजन थाळी ही कोरोना काळात गरिब व गरजू व्यक्तींसाठी मोठा आधार ठरत आहे. असे म्हणत शिवभोजन थाळी उपक्रमाचे आभार मानले.आज शिवभोजन केंद्रात,हितेश देशमुखे रजनीश भावसर,जय भोईटे, आदींनी शिवथाळी सोबत जिलेबी चे वितरण केले.यामुळे गरजू लाभार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.