व्यापाऱ्यांची दोन कोटी १६ लाख १८ हजार ची फसवणूक # चोपडा शहर पोलिस स्टेशनला पाच जणांवर गुन्हा दाखल

Featured जळगाव
Share This:

व्यापाऱ्यांची दोन कोटी १६ लाख १८ हजार ची फसवणूक # चोपडा शहर पोलिस स्टेशनला पाच जणांवर गुन्हा दाखल

चोपड्यातील सहा व्यापाऱ्यांची दोन कोटी १६ लाख १८ हजार ची फसवणूक # चोपडा शहर पोलिस स्टेशनला पाच जणांवर गुन्हा दाखल

मागणी चोपडा येथील घटना ; भुसार व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ

चोपडा ( (तेज समाचार प्रतिनिधी): मध्यस्था मार्फत ओळखीतून विश्वास संपादन करून गहू, मका, बाजरी व दादर या भुसार माला ची खरेदी करून त्याचा परतावा न देता सहा व्यापाऱ्यांची तब्बल २ कोटी १६ लाख १८ हजार रुपयात फसवणूक करून चुना लावल्याची घटना नुकतीच चोपडा शहरात घडली. या प्रकरणी मनमाड येथील तीन तर श्रीरामपूर येथील दोन भुसार व्यापाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने भुसार मालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड खडबळ उडाली आहे. नेहमी विश्वासावर चालणाऱ्या धंद्यात संगनमताने कटकारस्थान रचून व्यापाऱ्यांची २ कोटी पेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याची आज पर्यंतची सर्वात मोठी घटना होय.

चोपडा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भुसार मालाची खरेदी करणारे (१) मगनलाल गोविंदराम अग्रवाल २)म . शिवशंभू ट्रेडर्सचे प्रो.प्रा. अजय हरिश्चंद्र अग्रवाल ३) मे. अशोक मगनलाल अग्रवाल 4)माँ कालका पॉलीशर व क्लिनर्स एमआयडीसी प्रो. प्रा. अजय हरिश्चंद्र अग्रवाल (५) सौरभ ट्रेडर्सचे प्रो.प्रा.सतीश गोकुळ पाटील ६) मोरया ट्रेडर्स प्रो.प्रा.सौरभ सतीश पाटील यांचेशी मनमाड येथील दिनेश कांतीलाल लुणावत यांच्यामध्यस्थीने फिर्यादी सुनील मगनलाल अग्रवाल रा. अग्रसेन नगर चोपडा यांचेशी परिचय करून घेवरचंद पन्नालाल कोठारी रा. श्रीरामपूर प्रो. प्रा. अमित कोठारी, कोठारी ट्रेडींग कंपनी व कंपनीचे मालक प्रो.प्रा.संगीता अमित कोठारी दोन्ही रा. श्रीरामपूर, शुभम ट्रेडींग कंपनी प्रो.प्रा.शुभम राजेंद्र लुणावत, सुमित एजन्सी मनमाड प्रो. प्रा. सुमित राजेंद्र लुणावत, दिनेश कांतीलाल लुणावत रा. मनमाड यांनी पूर्वनियोजित कटकारस्थान रचून फिर्यादी सुनील मगनलाल अग्रवाल रा.चोपडा यांचेकडून सुरुवातीला भुसार मालाची खरेदी करून त्यांचा व्यापारात विश्वास संपादन केला. त्यानंतर वरील सर्व आरोपींनी संगनमत करून फिर्यादी सुनील मगनलाल अग्रवाल यांच्या कडून शुभम ट्रेडींग कंपनीच्या नावाने ७८, ३५,१३२/- रुपयांचा भुसार माल तसेच सुमित एजन्सी मनमाड या नावाने १०,२७, ७४९/- रुपयांचा गहू, मका बाजरी व दादर असा भुसार माल खरेदी करून त्या मालाचे पैसे आज पावेतो देण्यास टाळाटाळ करून फिर्यादी सुनील मगनलाल अग्रवाल यांचा विश्वासघात व फसवणूक करून ८८,६२,८८१/- रुपयांचा अपहार केला.

त्यानंतर आरोपी शुभम ट्रेडींग कंपनीचे प्रो.प्रा.शुभम राजेंद्र लुणावत व सुमित एजन्सी मनमाड प्रो. प्रा. सुमित राजेंद्र लुणावत, दिनेश कांतीलाल लुणावत रा. मनमाड यांनी १)मे. शिवशंभू ट्रेडर्सचे प्रो.प्रा. अजय हरिश्चंद्र अग्रवाल यांचेकडून ९४,६२, ३७७/- रुपये २) मे. अशोक मगनलाल अग्रवाल प्रो. प्रा. श अग्रवाल यांचेकडून ९,२१,५६०/- ध्ये ३) माँ कालका पॉलीशर व विल्र्स एमआयडीसी चोपडा प्रो.प्रा. अजय अग्रवाल यांचेकडून ७,१२,६७८ रूपये ४) सौरभ ट्रेडर्सचे प्रो.प्रा. सतीश कुळ पाटील यांचेकडून ३,९८,४५८/- रुपये ५) मोरया ट्रेडर्स प्रो.प्रा.सौरभ सतीश पाटील यांचेकडून १२,६०,३४२/-रुपये असा एकूण १,२०,४२,७३७/-रुपयांचे गहू, मका, बाजरी, दादर अशा भुसार मालाची दि.०२/०८/२०२० ते दि. १०/१२/२०२० या चार महिन्याच्या कालावधीत खरेदी करून आजपावेतो खरेदी केलेल्या मालाचे पैसे देण्यात टाळाटाळ करून फिर्यादी व वरील सर्व साक्षीदार यांचा विश्वासघात करून २ कोटी १६ लाख १८ हजार रुपयात फसवणूक केली. याप्रकरणी सुनील मगनलाल अग्रवाल (वय ५५) धंदा- भुसार व्यापार रा. अग्रसेन नगर चोपडा यांच्या फिर्यादीवरून १) दिनेश कांतीलाल लुणावत २) शुभम राजेंद्र लुणावत ( शुभम ट्रेडींग कंपनी ). मनमाड ३)सुमित राजेंद्र लुणावत (सुमित एजन्सी मनमाड ) ४) अमित कोठारी पूर्ण नाव माहीत नाही मे घेवरचंद पन्नालाल कोठारी रा. श्रीरामपूर ५) संगिता अमित कोठारी (कोठारी ट्रेडींग कंपनी) रा. श्रीरामपूर यांचे विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला भाग-५ गुरनं. २८१/२०२१ भादवि कलम -४०६,४२०, ४६७ १२० व ३४ प्रमाणे विश्वासघात व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *