पिंपरी, निगडी, वाकड मधून चार वाहने चोरीला

Featured पुणे
Share This:

पिंपरी (तेज समाचार डेस्क):  पिंपरी, निगडी, वाकड परिसरातून चार वाहने चोरीला गेली आहेत. तसेच हिंजवडी येथून चोरट्यांनी एक सायकल चोरून नेली आहे. याबाबत शनिवारी (दि. 7) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतन सुधीर खैरे (वय 28, रा. भोसरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खैरे यांची 30 हजारांची पल्सर दुचाकी (एम एच 14 / एफ डब्ल्यू 0292) अज्ञात चोरट्यांनी 3 नोव्हेंबर रोजी टाटा मोटर्स कंपनीच्या समोरील खुल्या पार्किंगमधून चोरून नेली आहे.

पिंपरी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील किसन वाघेरे (वय 55, रा. पिंपरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पाटील यांची 20 हजारांची दुचाकी (एम एच 14 / सी व्ही 7245) अज्ञात चोरट्यांनी 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्यांच्या घराजवळून चोरून नेली आहे. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत. चंद्रकांत नवनाथ जाधव (वय 26. रा. देहूगाव) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव यांची 30 हजारांची दुचाकी (एम एच 14 / एफ के 1810) अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (दि. 7) पहाटे नागमणी रेस्टॉरंट अॅंड बारच्या पार्किंगमधून चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

कफील महम्मद अन्सारी (वय 46, रा. थेरगाव, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अन्सारी यांची 20 हजारांची दुचाकी (एम एच 14 / डी पी 6371) अज्ञात चोरट्यांनी पडवळनगर, थेरगाव येथून चोरून नेली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत. तेजस प्रशांत जोशी (वय 29,रा. बावधन) यांनी त्यांची सायकल चोरीची हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जोशी यांच्या घरासोरून अज्ञात चोरट्यांनी 5 नोव्हेंबर रोजी दिवसभरात त्याची सात हजार रुपये किमतीची सायकल चोरून नेली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *