चोरीस गेलेले चार लाखाचे वीज पंप केळीच्या शेतात आढळून आले

Featured जळगाव
Share This:

चोरीस गेलेले चार लाखाचे वीज पंप केळीच्या शेतात आढळून आले.

कामावर गेलेल्या मजूरांना आढळले

शेत मालकाने दिली पोलिसांना माहिती.

यावल ( सुरेश पाटील): गुरुवार दिनांक 25/2/2021 च्या रात्री यावल पालिकेच्या साठवण तलावातून दोन वीज पंपाची व केबलची चोरी तसेच एका शेतकऱ्याच्या शेतातून2वीज पंपाची चोरी असा एकूण चार लाखाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता हे इलेक्ट्रिक पंप साठवण तलावा पासून काही अंतरावर असलेल्या अभय फेगडे यांच्या केळीच्या शेतात आज दिनांक 27 फेब्रुवारी 2021 रोजी शेतमजुरांना आढळून आले चोरीस गेलेला मुद्दे माल 24 तासात आढळून आल्याने यावल नगरपालिका वर्तुळात आणि संबंधित शेतकऱ्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बोरावल रस्त्यावर पालिकेचा साठवण तलाव आहे त्यावरून जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचवण्यासाठी तीस एचपी चे दोन पंप यावल नगरपरिषदेने बसविले होते त्याची किंमत तीन लाख रुपये आहे तर या पंपांना व वीजजोडणीसाठी लावलेली 60 मीटर वायर चोरट्यांनी लांबविली तिची किंमत 55 हजार रुपये आहे पालिकेच्या या घटनेत तीन लाख 55 हजार आचे साहित्य चोरी गेले व सव्वा लाखाचे नुकसान झाले तर या तलावाच्या जवळ असलेल्या डॉक्टर सतीश यावलकर यांच्या शेतातून क दहा व एक पाच अश्‍वशक्तीचा असे दोन पंचेचाळीस हजार रुपयाचे इलेक्ट्रिक पंप चोरट्यांनी लांबविली होते याप्रकरणी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता रमाकांत मोरे शेतकरी डॉक्टर सतीश यावलकर यांच्या फिर्यादीवरून दोन स्वतंत्र गुन्हे काल दिनांक 26 रोजी यावल पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आले आहे पीएसआय विनोद खांडबहाले हवालदार संजय तायडे यांनी कालच घटनास्थळी जाऊन रीतसर पंचनामा करून पुढील चौकशी सुरू केली होती या चोरीच्या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये व संपूर्ण यावल शहरात एकच खळबळ उडाली होती.
आज दिनांक 27 रोजी सकाळी साठवण तलावाच्या जवळ असलेल्या तसेच यावल शहरातील अभय फेगडे यांच्या केळीच्या शेतात केळीच्या पत्तीखाली चोरीस गेलेले इलेक्ट्रिक पंप लपवून ठेवले असल्याचे शेतकरी मजुरांना दिसून आले त्यांनीही माहिती शेठ मालकास सांगितल्याने शेतमालक अभय फेगडे यांनी यावल पोलीस स्टेशनची संपर्क साधून माहिती दिली यामुळे यावल पोलीस घटनास्थळी जाऊन मुद्देमाल ताब्यात घेऊन यावल पोलीस स्टेशनला घेऊन आलेत पुढील कार्यवाही सुरू आहे

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *