धुळे येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील रस्ता अपघातात चार जण ठार

Featured धुळे
Share This:
धुळे  (तेज समाचार प्रतिनिधि) : शहरातील देवपूर परिसरातील नगावबारी भागतून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 मुंबई-आग्रा महामार्गावर चौपदरी उड्डाणपूल आहे. याच उड्डाणपूलावर काल रात्री साडे दहा ते साडे अकरा च्या दरम्यान मोरबी (गुजरात ) येथून ट्रक क्रमांक एम एच  18 बीएल 9172 मध्ये फरशी भरून नेताना महामार्गावर याच दिशेने शिरपूरहुन नाशिक कडे वाळू भरलेला ट्रक क्रं.एम एच 18  ए ए 24 84 जाताना पाठीमागून फरशी भरलेला ट्रक वरती जोरदार पणे आदळला यात वाळूच्या ट्रकचा चेंदामेंदा झाला व केबिनमध्ये ट्रकचालक दाबला गेला होता या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती चालकाला बाहेर काढून तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारार्थ चक्कर बर्डी येथील हिरे मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी तपासणी करून ट्रकचालक मयत झाल्याचे घोषित केले त्याची ओळख पटली असून ट्रक चालकाचे नाव पंडित सुरेश सातदिवे वय.35 रा. कन्नड जिल्हा औरंगाबाद येथील आहे. अपघातग्रस्त वाळू भरलेला ट्रक महामार्गावरून हटवण्यात आला नव्हता.
 यानंतर फरशीचा ट्रक महामार्गावरून हटवण्यात आला. परंतु वाळूने भरलेला ट्रक महामार्ग वर तसाच उभा होता तो दुपारपर्यंत ही हटविण्यात आलेला नव्हता. अपघातग्रस्त ट्रक महामार्ग तसाच उभा होता त्याच्या आजूबाजूला सुरक्षेच्यादृष्टीने व अन्य वाहनचालकांच्या दृष्टीने सर्तकते करता कुठलीही सुरक्षा उप योजना करण्यात आलेली नव्हती.
 याच महामार्गवर टोल कर मोठ्या प्रमाणात वसूल करण्यात येतो.महामार्गावर सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही.रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. मात्र या बाबीकडे टोल वसुली करणारे मात्र बेफिकीर आहे.त्यांचा फक्त खर्च वसूली वरच भर आहे. सुविधा नाही.असा आरोप नागरिकांनी केला. महामार्ग पथक व महामार्ग टोल नाका यांच्या दिरंगाई व चुकीमुळेच आज गुरवारी सायंकाळी पाच वाजे दरम्यान भिषण अपघात झाला.असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला.
महामार्गावर अगोदरच काल अपघात ग्रस्त वाळू भरलेला ट्रक उभा होता त्याच ट्रकवर  गुरुवारी सायंकाळ च्या दरम्यान शिरपूरहुन नाशिक कडे टमाटेचा कॅरेटने भरलेला आयशर ट्रक क्रं.एम एच 18 ए ए 8384 हा जोरदार पणे आदळला यावेळी मोठा आवाज झाला. आवाज झाल्याने परिसरातील आजूबाजूचे नागरिक अपघात झाला पाहताच त्यांनी मदतीसाठी धावले. यादरम्यान अग्निशामक दलातील कर्मचारी पांडुरंग पाटील घरी जात असताना त्यांनी हा अपघात पाहिला ते हि मदतीसाठी धावले प्रवासी अडकले होते.
अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढतेवळी मोठा त्रास झाला.क्रेनची मदत घ्यावी लागली.रक्तबंबाळ प्रवासींना तातडीने नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून तीन  रुग्णवाहिकेतून चक्कर बर्डी येथील हिरे मेडिकल कॉलेज रुग्णालयामध्ये तातडीने नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी भरती करण्यात आले.
यावेळी महामार्गावरील दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती महामार्गावरीलसर्विस रोड मार्गाने वाहतूक सुरु करण्यात आली. वाहतूक संथ गतीने सुरू होती. महामार्ग वाहतूक पोलीस व देवपूर पोलिस यांची दमछाक झाली.
या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.अन्य चार जखमींवर उपचार करण्यात येत आहे. यात चालक याची ओळख पटली असून त्याचे नाव परेश रवींद्र जाधव आहे. तो याअपघातात जागीच मयत झाला आहे. अन्य दोन मृतांची ओळख पटलेली नाही .चार जखमींची ओळख पटली आहे त्यांची नावे खालील प्रमाणे मोहित बाविस्कर, रत्ना बाविस्कर, श्रद्धा जगताप, संगीता जगताप, उड्डाणपुल महामार्गावरील अपघातग्रस्त वाळूचा ट्रक काल तातडीने हटवण्यात आला असता तर आज अपघात होऊन पुन्हा तीन जणांचा आज जीव गेला नसता. असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
तालुक्यातील रस्त्यांवर वेगवेगळ्या अपघातात दोन ठार तर एक जखमी झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की मुंबई-आग्रा महामार्गावर फाट्याजवळ दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक झाली यात एक दुचाकीस्वार उपचारादरम्यान बाहेर झाला एक जण जखमी झाला. तसेच गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाला याबाबत सोनगीर व पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला गून्हा नोंद करण्यात आला आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *