हरिद्वारमध्ये मोठा रेल्वे अपघात, ट्रायल दरम्यान रेल्वेखाली चिरडून चोघांचा मृत्यू

Featured देश
Share This:

देहरादून  (तेज समाचार डेस्क):  हरिद्वार जिल्ह्यात एक मोठी रेल्वे दुर्घटना घडली. रेल्वे ट्रायलदरम्यान ट्रेनखाली चिरडून चार जणांचा मृत्यू झाला.

ट्रायलसाठी चालवण्यात आलेली गाडी 100 ते120 किलोमीटर प्रतीतासाच्या वेगाने धावत होती तेव्हा रेल्वेरुळावरुन जात असलेले हे चार जण गाडीखाली आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक सेंथिल अवूदई कृष्ण राज एस यांनी याबाबतची माहिती दिली. मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं त्यांनी सांगितलं.

हरिद्वार-लक्सर दरम्यान डबल रेल्वे लाईन टाकण्यात आली आहे. यावर जलद वेगात रेल्वे चालवून लाईनचं परिक्षण केलं जात होतं. त्यासाठी दिल्लीहून रेल्वे गाडी आणण्यात आली होती. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *