धुळे : दगडी शाळेत शिवकालीन किल्ल्यांचे प्रदर्शन.

Featured धुळे
Share This:
धुळे (तेज समाचार प्रतनिधि).  सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील युवक स्वराज्य ग्रुप तर्फे शिवजयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. दरवर्षी युवक स्वराज्य ग्रुप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीच्या विविध मुद्दयांवर
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
या वर्षी देखील युवक स्वराज्य ग्रुप तर्फे शिवजयंती निमित्त महाराजांच्या किल्ल्याचे प्रदर्शनाद्वारे त्या काळात असलेले किल्ल्यांचे वैभव आणि आताची दुरावस्था याबाबतीत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. २१ फेब्रुवारी २०२० ते २३ फेब्रुवारी २०२० दरम्यान सकाळी १० ते रात्री १० वा. पर्यंत अखंड सुरु राहील. सदर प्रदर्शन फुलवाला चौक जवळील शासकिय विद्या निकेतन दगडी शाळेच्या ग्राऊंडवर आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनात धुळे शहरातील अनेक विद्यार्थी व नागरिकांनी आवर्जुन भेट द्यावी असे आवाहन युवक स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष पुष्कर मगरे, जयेश घाडगे, वैभव पाटील, यश सोलंकी, विवेक पाटील, जितेंद्र पाटील, राधा नाईक, हर्षदा बोडके, वृषाली पाटील, सुमित पांडे,शुभम येलमामे, अनुज मराठे, सौरभ नाईक, कृष्णकांत पवार, गोपाल पाटील, मोनाक गुप्ता, अभिजीत मराठे,चैतन्य घड्याळजी, अजय पाटील, विजय पाटील तसेच सर्व सदस्यां तर्फे करण्यात आले.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *