
धुळे : घराचा ताबा न देण्याकरता पोटभाडेकरूने डोंबिवलीतील सेवानिवृत्त बँक मॅनेजरच्या कानाला पिस्तूल लावले
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): मोहाडी उपनगरातील घराचा ताबा न देण्याकरता डोंबिवलीतील सेवानिवृत्त बँक मॅनेजरच्या कान फाट्याला पिस्तूल लगावले. जीवे ठार मारण्याची धमकी दिली. चौघे फरार !
मोहाडी उपनगरातील डोंबिवली येथील सेवानिवृत्त बँक मॅनेजर यांनी मोहाडी प्र लळींग धुळे चे जागेत घराचे बांधकाम करायचे काम अनिल प्रभाकर देशमुख व सुनील प्रभाकर देशमुख यांना शिवाजी खैरनार यांनी सोपविले होते. परंतु खैरनार यांचा दोघांशी वाद झाला. या वादाचा त्रास शिवाजी खैरनार यांना झाला पाहिजे असे दोघांना वाटत होते. त्याकरता त्यांनी त्या जागेवर घराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर घराचे ताबा खैरनार यांना विश्वासात घेऊन त्यांना न देता. संगनमताने घर हे प्रदीप पांडुरंग जाधव व सौ मनीषा प्रदीप जाधव यांना राहण्यास देऊन टाकले. व खैरनार यांची फसवणूक केली खैरनार यांनी वेळोवेळी जाधव यांना सांगितले घर खाली करण्यास तगादा लावला.
शिवाजी खैरनार यांना प्रदीप पांडुरंग जाधव यांनी घराचा ताबा देणार नाही असे धमकावले.व जाधव यांनी स्वताचे जवळील पिस्तूल काढून खैरनार यांचे कानफटीला पिस्तूल लावून त्यांना धमकावले. जीवे ठार मारण्याची धमकी दिली. खैरनार यांच्या पत्नीच्या बनावट खोट्या सह्या करून बनावट कागदपत्रे तयार करून खैरनार यांची फसवणूक केली.
या प्रकरणी शिवाजी शेनपडु खैरनार वय.60 सेवानिवृत्त बँक मॅनेजर रा.प्लॉट.नं.26.नवकार्तिक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसा. खेडा रोड. डोंबिवली जिल्हा पूर्व ठाणे. यांनी मोहाडी उपनगरातील मोहाडी पोलिस ठाणे गाठून अनिल प्रभाकर देशमुख,सुनील प्रभाकर देशमुख, प्रदीप आप्पा पांडुरंग जाधव, सौ मनीषा प्रदीप जाधव यांनी फसवणूक केल्याप्रकरणी लेखी तक्रार नोंद केली आहे.
लेखी तक्रारी नोंदीच्या आधारे मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
पुढील तपास सपोनि संगीता राऊत करीत आहेत.