
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं मुंबईत निधन
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं मुंबईत निधन
मुंबई (तेज समाचार डेस्क) : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचं निधन झालं आहे. अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालंय. त्या 75 वर्षांच्या होत्या. मुंबईतल्या शिवाजी पार्कच्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सोमवारी (आज) पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनघा यांच्या पश्चात पती मनोहर जोशी, पुत्र उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन कन्या, असा परिवार आहे. अनघा यांचा विवाह 14 मे 1966 साली म्हणजेच शिवसेनेची स्थापना होण्याअगोदर एक महिना मनोहर जोशी यांच्याशी झाला होता. मनोहर जोशी यांना अनघा यांची मोलाची साथ लाभली. मनोहर जोशी यांच्या पाठीशी अनघा नेहमी खंबीरपणे उभ्या राहिल्या. मनोहर जोशी यांनी राजकारणात आणि समाजकारणात केलेल्या कामाच्या पाठीमागे अनघा यांचा मोठा हात आहे.