
भाजप माजी आमदार तारासिंग यांचे ह्रदयविकाराने निधन
भाजप माजी आमदार तारासिंग यांचे ह्रदयविकाराने निधन
मुंबई (तेज समाचार डेस्क): भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सकाळी 8.30 वाजता लीलावती हॉस्पिटलमध्ये निधन झाले. गेले महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. 5 वेळा नगरसेवक आणि 3 वेळा मुलुंडचे आमदार होते.
२०१९ मध्ये त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने ते थेट मातोश्रीवर धडकले म्हणून चर्चेत होते. उध्दव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यांचे चिरंजीव पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात सापडल्याने ते काहीसे वादग्रस्त ठरले होते.