
25 हजाराची लाच घेताना वनपरिक्षेत्र अधिकारी किरण माने एसीबीच्या जाळ्यात
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि). शिंदखेडा येथील वनपरिक्षेत्र विभागीय कार्यालयात 25 हजाराची लाच घेताना वन परिक्षेत्रीय अधिकारी किरण माने यादा लाचलुचपत विभागाने अटक केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की तक्रारदार यांनी बोगस प्रकरणे सादर केल्याने लोकसेवक किरण माने वन परिक्षेत्रीय अधिकारी प्रादेशिक शिदखेडा यांनी शिस्तभंगविषयी कारवाई करण्यात येईल या आशयाची नोटीस अदा केली होती. सदर नोटीस बाबत संदर्भात तक्रारदार लोकसेवक किरण वाले यांना भेटले असता लोकसेवक किरण माने यांनी शिस्तभंगविषयीच्या दिलेल्या नोटीस संदर्भात कारवाई न करण्याकरिता 2 लाख रुपये लाचेची मागणी केली. बाबत तक्रार सादर केली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता तक्रार यांच्याकडे लोकसेवक किरण गबाले यांनी दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती तडजोडी आधी त्यांनी कार्यालयात रोख 25 हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाने सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले. धुळे येथील लाचलुचपत विभागाने सदर कारवाई करून लाचखोर लोकसेवक किरण माने यांना गजाआड केले.