
वनरक्षक दत्तात्रय जाधव यांचे अपघाती निधन
वनरक्षक दत्तात्रय जाधव यांचे अपघाती निधन
ग्रामीण रुग्णालयात रात्रि 2 वाजेपासून मृतदेह पडून
यावल (तेज समाचार प्रतिनिधि): यावल पूर्व विभागात कार्यरत असलेले वनरक्षक तथा सेवानिवृत्त सैनिक दत्तात्रय जाधव वय 45 यांचे आज रविवार दिनांक 14 चे रात्री पाल तालुका रावेर येथून भुसावळ येथे आपल्या मोटरसायकलने भुसावळ येथे घरी जात असताना बामणोद गावाच्या पुढे भुसावळ कडून येणाऱ्या मारुती या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना रात्री 1 ते 2 वाजेच्या सुमारास घडली,
अपघातग्रस्त डी.डी. जाधव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्री 2 वाजेपासून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलेला आहे, यावल ग्रामीण रुग्णालयात कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचे मयताचे नातेवाईकांनी सांगितले, याबाबत फैजपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पुढील कार्यवाही सुरू केलेली आहे. मयत वनरक्षक डी.डी. जाधव हे मूळचे जामनेर येथील रहिवासी आहेत ते भुसावळ येथे त्यांच्या पत्नी व एक मुलगा एक मुलगी यांच्यासह राहत होते, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन मधील दीपक जाधव यांचे ते भाऊ तर जामनेर येथील अशोक पैहलवान उर्फ जाधव यांचे ते पुतणे होते त्यांच्या अकस्मात अपघाती निधनामुळे त्यांच्या नातेवाईकांमध्ये तसेच संपूर्ण यावल व पश्चिम वन कर्मचारी वर्गात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.