
सलग चौथ्यांदा नीतीश कुमार होणार मुख्यमंत्री, एनडीएला स्पष्ट बहुमत
पटणा (तेज समाचार डेस्क): बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे सलग चौथ्यांदा नीतीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्यासाठी संधी मिळणार आहे.भाजपाप्राणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व 243 जागांचे निकाल हाती आले आहेत. एनडीने 125 जागा मिळवत मॅजिक फिगर गाठली असल्यामुळे नितीश कुमार मुख्यमंत्री होणार आहेत.
दरम्यान, 125 जागांमध्ये 74 जागा भाजपने, 43 जागा जेडीयू आणि मित्र पक्षांनी 8 जागांवर मिळवला आहे.