
शिरसाड गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच सदस्य तेजस पाटील व ज्योती सोनवणे यांनी मांडली विकासाची ब्ल्यू प्रिंट
शिरसाड गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच सदस्य तेजस पाटील व ज्योती सोनवणे यांनी मांडली विकासाची ब्ल्यू प्रिंट…
यावर (सुरेश पाटील): 15 व्या वित्त आयोगाच्या कृती आराखडा तयार करण्याची मिटिंग4 मार्च2021रोजी ग्रामपंचायत कार्यालय शिरसाड येथे घेण्यात आली.त्यामध्ये वार्ड क्र.4 मधून निवडून आलेले तेजस धनंजय पाटील व ज्योती प्रवीण सोनवणे या दोन सदस्यांनी लेखी स्वरूपात सर्व सभागृहासमोर संपूर्ण गावासाठीची विकासाची ब्ल्यू प्रिंट सादर केली. यामध्ये गावाचा सर्वांगीण विकास व गाव डिजिटल करण्यासंदर्भात मुद्दे मांडण्यात आले.सदर ब्ल्यू प्रिंटची गावामध्ये जोरदार चर्चा असून,सर्वत्र दोघे सदस्यांचे कौतुक होत आहे. विकासात्मक ब्लु प्रिंट मध्ये शेतकरी, महिला व तरुण यांना समोर ठेवून तयार करण्यात आल्याची माहिती तेजस धनंजय पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.यावेळी पंचायत समिती कडून वानखेडे रावसाहेब उपस्थित होते.तसेच सरपंच,उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक,इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.