
जळगाव विमानतळावरुन जूनपासून सुरू होणार विमानसेवा
जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि): जळगाव विमानतळावरुन १ जूनपासून विमानसेवा सुरु होणार आहे. यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले आहे. कुसुंबा येथील वैद्यकीय अधिकार्यांसह पाच ते सहा जणांना विमानाने येणार्या प्रवाशांच्या वैद्यकीय तपासणीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून थांबवण्यात आलेली विमानसेवा सुरु करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी चार दिवसांपासून स्थानिक विमान प्राधिकरण व विमान कंपनीतर्फे फिजिकल डिस्टन्सिंगबाबत आवश्यक त्या उपाययोजना, तसेच कामाची रंगीत तालिम करीत आहे. येथील स्टाफ व सुरक्षारक्षक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. १ जूनपासून आठवड्यातून मंगळवार, गुरुवार व शनिवार या ३ दिवशीच मुंबईसाठी तर अहमदाबादसाठी सहा दिवसांसाठी विमानसेवा पुरवण्यात येणार आहे.
आमची तयारी, मात्र हिरव्या कंदीलाची प्रतीक्षा
विमानसेवा सुरू करण्याची आमची तयारी आहे. त्यादृष्टीने आम्ही विमानतळ अधिकारी व कर्मचाऱ्यांची सर्व पाहणी व अभ्यास झाला आहे. वैद्यकीय पथक देखील सज्ज झाले आहे. आम्हाला फक्त मुंबईतील वरिष्ठांकडून होकार अपेक्षित आहे.
– अखिलेश
विमानतळ व्यवस्थापक