सामुहिक बलात्कार प्रकरणात पोलीस अधीक्षकासह पाच अधिकारी निलंबीत

Featured महाराष्ट्र
Share This:

हाथरस (तेज समाचार डेस्क): हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात एबीपी न्यूजच्या मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रांत वीर सिंह, क्षेत्राधिकारी (सीओ) राम शब्द, पोलीस निरीक्षक दिनेश कुमार वर्मा, उपनिरीक्षक जगवीर सिंग आणि महेश पाल यांना निलंबित करण्यात आले आहे. हाथरस प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई केली आहे. तसेच दोन्ही पक्षांची (पीडित आणि आरोपी) नार्को टेस्ट केली जाणार आहे.

त्याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेबाबत ट्वीट करत म्हटलं की, उत्तर प्रदेशातील माता-भगिनींचा सन्मान आणि स्वाभिमानाला हानी पोहण्याची कल्पना करणाऱ्यांचा विनाश निश्चित आहे. अशांना अशी शिक्षा मिळेल जी भविष्यात एक उदाहरण ठरेल. उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक माता-भगिनींच्या सुरक्षा आणि विकासासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आणि वचन आहे. 14 सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आले. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत तरुणीची जीभ कापली. यानंतर तिला अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला सोमवारी (28 सप्टेंबर) दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे तिने मंगळवारी सकाळी प्राण सोडले. या प्रकरणातील चार आरोपींना पकडलं असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

सध्या संपूर्ण भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. राजकीय नेत्यांनाही पीडित कुटुंबापासून दूर ठेवण्यात आले. तसेच प्रशासनाने माध्यमांशी गैरवर्तन केले आहे. एबीपी न्यूजच्या टीमला हाथरस येथे भेट देण्यापासून रोखलं गेलं. हाथरस प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटी चौकशी नेमली आहे. माध्यमांना कशा प्रकारे रोखण्यात येते त्याच्या व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारच्या या मनमानीबद्दल तीव्र नाराजीचा सूर आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *