नाशिक मध्ये 9 महिन्याच्या गर्भवतीचा कोरोनानी मृत्यु

Featured नाशिक
Share This:

नाशिक (तेज समाचार डेस्क). रेड झोन मध्ये असलेल्या नाशिक मध्ये कोरोना संक्रमित पहिल्या रुग्णाचा मृत्यु नोंदला गेला आहे. तीन दिवसा पूर्वी मरणपावलेल्या या महिलेचा रिपॉर्ट पॉजिटिव आला आहे. त्यामुळे शहरात पहिल्या करोना बळीची नोंद झाली असून जिल्ह्यातील मृतांची संख्या 13 झाली आहे.

– नव्या 4 रुग्णांची भर
जिल्हा प्रशासनाला मंगळवारी सकाळी 80 संशयित रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जिल्ह्यात नव्याने चार रुग्णांची भर पडली आहे. नाशिक शहरामध्ये बजरंग वाडी येथे वास्तव्यास असलेल्या एका महिलेचाही त्यामध्ये समावेश आहे. नऊ महिन्यांची गर्भवती असलेली ही महिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शनिवारी सायंकाळी साडेपाचला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. या महिलेची लक्षणे कोविड -19 सदृश आजाराची असल्याने तिचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. दरम्यान दोन तासांतच सायंकाळी साडेसातला तिचा मृत्यू झाला.

या महिलेचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला. तो पॉझिटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ही महिला शहरातील पहिला करोना बळी ठरली आहे. ही महिला मूळची उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून एक वर्षांपूर्वी पतीसोबत नाशिकमध्ये वास्तव्यास आली होती. तिला हृदयविकाराचा त्रास होता, अशी माहिती पुढे आली आहे. या महिलेला हृदय विकाराचा त्रास होता. 2 मे रोजी अत्यवस्थ अवस्थेत ती सिव्हिल हॉस्पिटलला दाखल झाली होती. त्यानंतर दोन तासांतच तिचा मृत्यू झाला. तिचा अहवाल आज मिळाला असून ती करोना पॉझिटिव्ह होती, असं आढळून आलंय. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या 382 झाली असून आतापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या सटाणा तालुक्यातही कोरोनानं शिरकाव केला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *