धुळे जिल्ह्यात सापडलेल्या पहिल्या कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णाचा मृत्यु

Featured धुळे
Share This:

धुळे (तेज समाचार डेस्क). कोरोना वीषाणूचा प्रादुर्भाव दिनसेन दिवस वाढतच आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मृतकांचा आंकडा पण वाढत आहे. तरी ही राज्यातले काही जिल्हे असे पण आहे, जिथे अजून सुद्धा एक ही कोरोना संक्रमित रुग्ण सापडला नाही. त्याच जिल्हापैकी एक होता धुळे जिल्हा. पण आता रुग्ण नसलेल्या जिल्हाचा सूची मधून धुळे जिल्हा वगळला आहे. कारण इथे पण आता एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार साक्री येथील कोरोना संशयित 53 वर्षीय व्यक्तीला 8 एप्रिल, 2020 रोजी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅबचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. परंतु त्यांचा आज पहाटेपूर्वी 1.30 वाजता मृत्यू झाला आहे. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल आज प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. हा धुळे जिल्ह्यातील पहिला कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आहे. तसेच मालेगाव येथील एक महिला रुग्ण 9 एप्रिल, 2020 रोजी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलगिकरण कक्षात दाखल असून तिचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असे डाॅ. आर. आय. सुर्यवंशी, वैद्यकीय अधीक्षक तथा नोडल अधिकारी  भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय यांनी कळविले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *