धुळे : बाराही महिने कसाकाय हो धगधगतो वरखेडी कचरा डेपा? पेटतो कि पेटवल्या जातो!!!

Featured धुळे
Share This:
धुळे (तेज समाचार डेस्क). धुळ्यातील वरखेडी रोडवरील महानगरपालिकेचा गांडूळ खत प्रकल्प कचरा डेपो बाराही महिने धगधगणारा डेपो अशी याला जणू ख्याती मिळाली आहे. वरखेडी रोडवरील गांडूळ प्रकल्पाला पावसाळा उन्हाळा, हिवाळा,तिन्ही ऋतूंमध्ये आग लागते. ही आग नेमकी लागते की लावली जाते हा एक संशोधनाचा भाग ठरलेला आहे. यात कचरा जळून मोठ्या प्रमाणात नुकसान होते नेमके पाणी कुठे मुरते हे अद्याप मनपा प्रशासनाला गवसलेले नाही.याकडे मनपा आयुक्त लक्ष देतील का असा खडा सवाल वरखेडी ग्रामस्थ देखील विचारात आहे.
– ग्रामस्थांचा विरोध
वरखेडी ग्रामस्थांनी या कचरा डेपोला विरोध केला . वरखेडी डेपो येथून हटवा यासाठी निवेदने आंदोलनेही झाले परंतु याकडे नेहमीच दुर्लक्ष झाले.हा कचरा डेपो येथून हटवा अशी मागणी केली परंतु ग्रामस्थांच्या पदरी निराशाच आली.धूळ धूर उग्र वास यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो परंतु मनपा याकडे नेहमीच दुर्लक्ष करते.
– अजून धगधगत आहे आग, विझवण्याचे काम सुरूच
आज बुधवारी सायंकाळी सुद्धा अचानकपणे  कचरा डेपोला आग लागली आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली माहिती मिळताचअग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी रवाना झाले त्यांनी आगीवर पाणी मारा करून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. वाऱ्यामुळे लांबपर्यंत कचरा पडलेला आहे आगही लांब दूरवर लागल्याने आगीवर पाणी मारा करून नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशामक दलाचे जवान करत आहे. या आगीत हजारों रुपयांचा कचऱा जळून नुकसान झाले असून अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम मनपा अग्निशामक दलाचे जवान करत आहे.दोन गाड्या पाणी मारा करण्यासाठी कचरा डेपोत दाखल झाल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी यांना ही माहिती देण्यात आली परंतु कोणी अधिकारी अद्याप कचरा डेपो कडे फिरकले सुद्धा नाही.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *