
अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द नाहीच- सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय!
अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द नाहीच- सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय!
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. अंतिम वर्षाच्या परीक्षा झाल्याच पाहिजेत, परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करुन पुढील वर्गात पाठवता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय.
आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत परीक्षेच्या तारखा निश्चित करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिले आहेत. विद्यार्थ्यांना पुढील वर्षात पाठवण्यासाठी राज्यांनी परीक्षा घेणं आवश्यकच आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत साथीच्या आजाराच्या दृष्टीने राज्ये परीक्षा पुढे ढकलू शकतात आणि तारखा निश्चित करण्यासाठी यूजीसीशी सल्ला मसलत करु शकतात, असं न्यायालयाने म्हटलंय.
अंतिम वर्षाच्या परीक्षा झाल्याच पाहिजेत, त्या आवश्यक आहेत, आधीच्या सत्रांच्या गुणांच्या आधारे मूल्यांकन करणे आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कक्षेत बसत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.