अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर सोडल्याने तहसीलदार व मंडळ अधिकारी विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल

Featured जळगाव
Share This:

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर सोडल्याने तहसीलदार व मंडळ अधिकारी विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल.

 

यावळ (सुरेश पाटील):फेब्रुवारी 2021मध्ये यावल तहसीलदार, यावल मंडळ अधिकारी यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर दंडात्मक कारवाई न करता सोडून दिल्याच्या कारणावरुन आरपीआय आठवले गटाचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष अशोक तायडे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दि.29एप्रिल2021रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दिलेल्या निवेदनात आरपीआयचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष(आठवले गट) अशोक गोवर्धन तायडे यांनी म्हटले आहे की यावल मंडळ अधिकारी तथा सर्कल यांनी फेब्रुवारी2021या महिन्यात अवैध मार्गाने गौण खनिजाची तस्करी करताना ट्रॅक्टर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते परंतु तहसीलदार व मंडळ अधिकारी यांनी संगनमत करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालका विरुद्ध दंडात्मक कारवाई न करता शासनाचा महसूल बुडवून ट्रॅक्टर सोडून दिले या प्रकरणात शासनाची फसवणूक करून आपल्या पदाचा दुरुपयोग करीत कर्तव्यात कसूर केला आहे म्हणून या अधिकाऱ्यांवरच विशेष दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी अशोक तायडे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केली आहे.या प्रकरणात जिल्हाधिकारी जळगाव गौण खनिज विभाग काय कारवाई करणार? याकडे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे लक्ष वेधून आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *