‘उल्लू’ अ‍ॅपचे मालक विभू अग्रवालविरोधात गुन्हा दाखल; लैंगिक शोषणाचा आरोप

Featured धुळे महाराष्ट्र
Share This:

 

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): ‘उल्लू डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड’ Ullu या चित्रपट निर्मिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विभू अग्रवाल Vibhu Agarwal यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी लैंगिक शोषणाविरुद्धचा गुन्हा दाखल केला आहे. विभूवर एका महिलेनं लैंगिक शोषणाचे आरोप केले असून पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कंपनीच्या कंट्री हेड अंजली रैनाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ४ ऑगस्ट रोजी मुंबईतील अंबोली पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

विभू यांची ‘उल्लू डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी अश्लील व्हिडीओंमुळे चर्चेत होती. २०१३ मध्ये त्यांनी ‘बात बन गई’ या चित्रपटाची निर्मिती केली. २०१८ मध्ये त्यांनी ‘उल्लू’ हा अ‍ॅप लाँच केला. यावर हिंदी आणि इंग्रजीसोबतच इतरही अनेक भाषांमध्ये कार्यक्रम प्रसारित केले जाता.

मे महिन्यात ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत विभू यांनी अ‍ॅपवरील कंटेट बदलणार असल्याचं सांगितलं होतं. “आम्हाला उल्लू या अ‍ॅपबद्दल लोकांची विचारसरणी बदलायची आहे. या अ‍ॅपवरील ६० टक्के कंटेट हा कौटुंबिक कंटेट म्हणून रुपांतरित करायचा आहे. आमचंसुद्धा एक कुटुंब आहे आणि उल्लू या अ‍ॅपचा नाव घेतला तर लोक वेगळ्या पद्धतीने विचार करू लागतात. आम्हाचा हेच बदलायचं आहे”, असं ते म्हणाले होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *