गोमास जातीच्या प्राण्याची हत्या करुन मास कापणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल-1 आरोपी अटक

Featured जळगाव
Share This:

गोमास जातीच्या प्राण्याची हत्या करुन मास कापणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल. 1 आरोपी अटक

उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे .

यावल– रावेर तालुक्यात बेकायदा कत्तलखाने.

यावल ( सुरेश पाटील ) : गोमास जातीच्या प्राण्याची हत्या करून त्याचे मांस कापत असताना मिळून आल्याने यावल पोलीस स्टेशनला एका विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केल्याने यावल शहरासह संपूर्ण यावल रावेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
गोमास जातीच्या प्राण्याची हत्या करून मास कापणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये म्हणून यावल शहरातील काही मध्यस्थी आणि दलालांनी यावल पोलिसांवर मोठा दबाव आणणेसाठी प्रयत्न केल्याचे आणि ते मध्यस्थी यावल पोस्टेला आल्याची नोंद यावल पोलीस स्टेशन मधील सीसीटीव्ही कॅमेरात सुद्धा कैद झाल्याचे यावल पोलीस स्टेशन आवारात बोलले जात होते आणि आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की पो.कॉ. सतीश एकनाथ भोई यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 2 ऑगस्ट 2020 रविवार रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास यावल चोपडा रोडने हॉटेल खान दरबार येथून गस्त करीत असताना तेथे रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या गल्लीमधील झोपडपट्टी भागात लोकांची पळापळ सुरु झाली म्हणून खाली उतरून त्या ठिकाणी बघितले असता एका प्लॅस्टिक कागदाच्या आडोशाला व सार्वजनिक जागेवर आरोपी अफजल करीम शेख वय 30 राहणार डांगपुरा यावल हा बेकायदा विनापरवाना गोवंश जातीच्या प्राण्याची हत्या करून त्याचे मास कापत असताना मिळून आला त्याचे जवळून गोवंश जातीचे प्राण्याचे मांस त्याचे वजन 15 किलो किंमत 3 हजार रुपये मास कापण्याच्या दोन सुऱ्या व एक कुऱ्हाड किंमत 50 रुपये, एक लाकडी गोलाकार ओंडका किंमत 50 रुपये व इतर किरकोळ काही वस्तू असा एकूण 3100 ( एकतीस शे रूपये ) रुपयाचा माल जप्त करून यावल पोलीस स्टेशनला भाग 5 गु. र.नं. 132 / 2020 भा.द.वी. कलम 429 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 कलम 5, 6,9, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 119 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या आदेशान्वये सहाय्यक फौजदार नेताजी पंडित वंजारी हे करीत आहेत. यामुळे यावल शहरासह संपूर्ण तालुक्यात बेकायदेशीर गोमास जातीच्या प्राण्याची हत्या आणि कत्तल करणार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
गस्त घालीत असताना बेकायदेशीररित्या गोमास जातीच्या प्राण्याची हत्या करून त्याचे मास कापत असताना एक कसाई यावल पोलिसांना प्रत्यक्ष आढळून आल्याने आणि त्या आरोपीला यावल पोलीस स्टेशनला आणल्या बरोबर शहरातील काही प्रतिष्ठित आणि मध्यस्थ दलाल यांनी सकाळी 9 वाजेपासून यावल पोस्टला येऊन आपला सामाजिक राजकीय प्रभाव टाकण्याचा चांगलाच प्रयत्न केला परंतु दबावाला न जुमानता यावल पोस्टेला गुन्हा दाखल झाल्याने शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली उच्च न्यायालयाचा आदेश लक्षात घेता गोमाता व राष्ट्रहित, सामाजिक हित व जातीय सलोखा कायम राहणेसाठी सत्ताधारी व विरोधी राजकीय पक्षांनी तथा लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी यावल पोलिसांना राजकीय,सामाजिक, शासकीय पाठबळ उभे करून द्यायला पाहिजे असे यावल शहरासह संपूर्ण रावेर विधानसभा मतदार संघात बोलले जात असून राजकीय सामाजिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी जळगाव तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे लेखी स्वरूपात पाठपुरावा करून यावल रावेर तालुक्यात जे काही अवैध कत्तलखाने खुलेआम सुरू आहेत ते बंद करून जातीय सलोखा आणि कायदा सुव्यवस्था शांतता राखणे कामी ठोस निर्णय घेऊन कार्यवाही करायला पाहिजे तसेच शासनाच्या सुधारित नियमावलीनुसार नगरपालिका किंवा ग्रामपंचायत हद्दीत अत्याधुनिक पद्धतीने शासकीय निकषानुसार सर्व सुविधायुक्त कत्तलखाने किंवा मास विक्री करण्याची परवानगी संबंधित यंत्रणेने द्यायला पाहिजे अशी सुद्धा सर्वस्तरातून मागणी होत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *