शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल करा

Featured जळगाव
Share This:

शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल करा

यावल शहरातील मुस्लिम बांधवांची मागणी.

यावल (सुरेश पाटील):शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या दुखावल्या आहेत म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावल शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे.
दि.15सोमवारी संध्याकाळी यावल शहरातील मुस्लिम बांधवांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही मुस्लिम धर्माचे अनुयायी आहेत दि.15मार्च 2021रोजी उत्तरप्रदेश येथे राहणारे शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून इस्लाम धर्माचे सर्वात पवित्र धर्मग्रंथ कुराणामध्ये बदल करून त्यांच्यात असलेले आयता एकूण 26 आयता वगळण्यात यावीत अशी मागणी केली.आमचा विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट यांची याचिका दाखल न करता फेटाळून लावेल पण वसीम रिजवी यांनी याचिका दाखल केल्यानंतर प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना कुराण व मुसलमानांचे सुरुवातीची तीन खालीफा विरुद्ध अनेक खोटे व बिनबुडाचे आरोप लावले आहेत.मुख्यता त्याने सांगितले की कुराण हे आंतवादाची शिकवण देतो व इस्लामचे सुरुवातीचे तीन खालीफा यांनी ताकदीचा प्रयोग करून इस्लामाचा फैलावा केला. कुराण मुळे मुस्लिम खालीफा यांनी ताकदीचा प्रयोग करून इस्लामाचा फैलाव केला.कुराण मुळे मुस्लिम युवक आतंकवादाकड़े वळत आहे वगैरे वगैरे वासिम रिजवी यांनी दिलेले प्रसिद्धीमाध्यमांना बाईट/माहिती सर्वत्र पसरलेले आहे व त्यांचे बोलणे एकूण सर्व मुस्लिम धर्म मानणारे लोकांचे धार्मिक भावना दुखावल्या आहेत व इतर धर्माचे लोकांमध्ये अशी चुकीची माहिती अपप्रचार केल्यामुळे मुस्लिम धर्म व इस्लाम बाबत इतर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम वसीम रिजवीने यांनी केलेले आहे तरी वसीम रिजवी यांच्याविरुद्ध भा.द.वी.295 व आय.टी.ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा व कडक शासन करावे अशी मागणी दिलेल्या निवेदनावर स्वाक्षरी करणारे अजहर शेख,नदीम रजा खाटीक, तौसिफ शेख,कदीर खान,अल्ताफ शेख,राजू पिंजारी,पप्पू बिल्डर, जावीद शेख,आसिफ शेख,शेख असलम,जहीर खान,इम्रान पहेलवान इत्यादी मुस्लिम बांधव व सामाजिक पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *