शिव भोजन थाळीला भ्रमणध्वनी क्रमांक जोडण्याचा यावल पुरवठा विभागाचा फतवा

Featured जळगाव
Share This:

शिव भोजन थाळीला भ्रमणध्वनी क्रमांक जोडण्याचा यावल पुरवठा विभागाचा फतवा.

महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे षड्यंत्र.

यावल (सुरेश पाटील): महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे षडयंत्र यावल तहसील मधील पुरवठा विभागामार्फत सुरू झाले असून शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक जोडावा असा फतवा काढला गेल्याने शिवभोजन थाळी केंद्र संचालक आणि लाभार्थ्यांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
यावल येथील शिवभोजन थाळी केंद्र चालविण्याची परवानगी एका महिला बचत गटाने अधिकृतरीत्या घेतलेली आहे, शिवभोजन थाळी केंद्रातुन खऱ्या गोरगरीब गरजू लाभार्थ्यांना शिवभोजन थाळीचा लाभ मिळत आहे,या केंद्राबाबत कोणत्याही गरजू गरीब लाभार्थ्यांची तक्रार नसताना तसेच महाराष्ट्र शासनाकडून किंवा जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडून अधिकृत आदेश नसताना यावल तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील एक महिला अधिकारी शिवभोजन थाळी केंद्रास भेट देऊन शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक रजिस्टरला नोंद करावी अशा सूचना वजा फतवा काढून शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या गरीब लाभार्थ्यांना आणि शिवभोजन थाळी केंद्र संचालकांना नाहक अडचणीत आणून वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहे,शिवभोजन थाळीचा लाभ घेणारे हे अत्यंत गरीब परिस्थितीतील स्त्री-पुरुष गरीब आजारी रुग्ण असल्याने त्यांच्याजवळ मोबाइल येणार कोठून याचे आत्मचिंतन पुरवठा विभागाने करायला पाहिजे, त्याचप्रमाणे इतर अनावश्यक सूचनासुद्धा देऊन लाभार्थी आणि शिवभोजन केंद्र संचालकांना कायद्याचा धाक दाखवून त्यांच्या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत आहेत याबाबत राज्य सरकार कडून किंवा जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडून काही लेखी आदेश आले आहेत का?आणि आले नसतील तर यावल पुरवठा विभागातील ती महिला अधिकारी शिवभोजन केंद्रातील लाभार्थ्यांना नाहक मानसिक त्रास कोणत्या उद्देशाने आणि हेतूने देत आहेत याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.याकडे जिल्हाधिकारी जळगाव यांनी आपले लक्ष केंद्रित करून शिवभोजन थाळी केंद्रावर लाभ घेणाऱ्या गरजू गरीब जनतेच्या हितासाठी पुढील कार्यवाही करावी अशी मागणी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेणाऱ्या नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *