
मंठा जि. जालना येथील विवाहित तरुणी वैष्णवी गोरे हिचे निर्घुण हत्या प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवावे व आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी,-अ. भा. महात्मा फुले समता परिषद शिरपूर तर्फे मागणी
मंठा जि. जालना येथील विवाहित तरुणी वैष्णवी गोरे हिचे निर्घुण हत्या प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवावे व आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी,-अ. भा. महात्मा फुले समता परिषद शिरपूर तर्फे मागणी
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि मनोज भावसार): मंठा जिल्हा जालना येथील विवाहित तरुणी वैष्णवी गोरे हिच्या निर्घुण हत्या प्रकरणी ऍड. उज्वल निकम यांची नियुक्ती करून हे प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवावे व सदर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शिरपूर तर्फे तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली.
मंठा तालुका मंठा जिल्हा जालना येथील एका गरीब रिक्षाचालक असणाऱ्या व्यक्तीची मुलगी विवाहित तरुणी वैष्णवी गोरे हिचा 6 दिवसांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर वैष्णवी गोरे मंठा येथील आपल्या माहेरी आली असताना तेथील गाव गुंड शेख अल्ताफ शेख बाबू याने एकतर्फी प्रेमातून धारदार शस्त्राने हल्ला करून सदर तरुणीची निर्घुण हत्या केली. सदर आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी व वैष्णवी गोरे या तरुणीस तसेच तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा असे निवेदन देण्यात आले.
आरोपी शेख अल्ताफ शेख बाबू यांनी केलेल्या अमानुष कृत्याबद्दल त्याला फाशीची शिक्षा मिळावी म्हणून ऍड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी तसेच न्यायालयीन प्रक्रिया फास्ट ट्रॅक न्यायालयात करण्यात येऊन फाशीची शिक्षा व्हावी असे निवेदन तहसीलदार आबा महाजन यांना देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष दीपक महादू माळी, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष महारु माळी, नगरसेवक देवेंद्र राजपूत, महासंघाचे तालुका उपाध्यक्ष निलेश देविदास महाजन, नितीन लक्ष्मण माळी, समता परिषदेचे तालुका युवा अध्यक्ष योगेंद्र हिलाल माळी, महादू राजाराम माळी, सुनील मधुकर माळी, दिनेश युवराज माळी, अनिल रतन माळी, महेश खंडू वाघ, अशोक सिताराम माळी, संदीप अर्जुन माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.