शेतकरी आता बांधावरूनच करणार पिक पाहणी

Featured जळगाव
Share This:

शेतकरी आता बांधावरूनच करणार पिक पाहणी.

किनगाव मंडळात ‘इ’ पिक पाहणीच्या प्रात्यक्षिकाला सुरुवात.

यावल (सुरेश पाटील): महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील30जुलै 2021च्या शासन निर्णयानुसार या महसुली वर्षा पासून आता ‘इ’ पीक पाहणी ला सुरुवात झाली.  जळगाव जिल्हासाठी ‘इ’ पीक पाहणी या मोबाईल app मधून पीक पाहणी भरण्यासाठी 15ऑगस्ट नंतर उपलब्ध होणार आहे.शेतकरी खातेदारांना या योजनेचा लाभ घेतायावा यासाठी किनगाव मंडळात चिंचोली गावापासून demo app व मुख्य app द्वारे पीक पाहणी भरणे व ते app डाउनलोड करून घेणेचे प्रक्षिशण शेतकरी खातेदार याना देण्यात आले.यासाठी शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष शेतात appचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.यावेळी शेतकरी यांनी स्वतःपिक पाहणी app वर भरून घेतली, अधिकाधिक शेतकरी यांनी सदरचे app download करून घ्यावे यासाठी एक व्हाट्स अप ग्रुप तयार करण्यात आला आहे.यावेळी मंडळ अधिकारी सचिन जगताप,तलाठी निखील मिसाळ,विलास नागरे,कोतवाल ज्ञानेश्वर कोळी,जहांगीर तडवी माजी सरपंच अनिल सोळुंके,शेतकरी खातेदार दीपक बडगुजर,विजय पाटील,शरद सोळुंके,सचिन साठे,संजय साठे,सुनिल साठे,शाम सूर्यवंशी,निमल बडगुजर,भूषण पाटील इत्यादी उपस्थित होते.यावेळी मंडळ अधिकारी सचिन जगताप तलाठी निखिल मिसाळ यांनी शेतकरी खातेदार याना app चे प्रक्षिशन दिले.
App च्या वापराबद्दल करावयाची कार्यवाही 1)शेतकरी यांनी स्वतःची नोंदणी करणे साठी अँड्रॉइड मोबाईल द्वारे गुगलplay store वरून ‘इ’ पीक पाहणी हे अप्प down load करून घ्यावे2)खातेदारांनेapp मध्ये मोबाईल नंबर ची नोंद नि करुन घ्यावी 3)सातबारामधील नावाप्रमाणे खातेदारांने त्याच्या नावाची अचूक नोंदणी करावी4)ज्या खातेदारांचे एकाच गावात एका पेक्षा जास्त खाते क्रमांक असतील त्याने त्याचे नाव नमूद केल्यास त्याचे त्या गावातील सर्व खाते क्रमांक व त्या खालील सर्व गट क्रमांक मोबाईल स्क्रीन वर नोंदणी साठी उपलब्ध होतील,5)वरील प्रक्रिया पार झाल्यावर खातेदार यांच्या नोंदणी केल्यावर मोबाईल वर एक चार अंकी पासवर्डsmsद्वारे उपलब्ध होईल6)तो चार अंकी पासवर्ड टाकून नोंदणी पूर्ण करता येईल7)शेतकरी यांच्या नोंदणी करीता त्याचा अद्ययावत सातबारा आठ ‘अ’ सोबत असल्यास योग्य राहील8)सामायिक मालकीच्या जमिनी मध्ये ज्याचे नाव गाव नमुना सातबारा मध्ये सामायिक म्हणून नोंदवलेले आहे ते स्वतंत्र पणे नोंदणी करू शकतील9)अल्पवयीन खातेदारच्या बाबतीत त्याचे पालक नोंदणी करू शकतील10)मोबाईलवर आलेला चार अंकी पासवर्ड कायम स्वरूपी जतन करून ठेवणे आवश्यक राहील,11)एका मोबाईल नंबर हुन 20 खातेदार ची नोंदणी करता येईल,12)मोबाईल मध्ये google indiac key board असणे आवश्यक राहील नसल्यास
google play store वरून down load करून घ्यावे असे किनगाव मंडळ अधिकारी सचिन जगताप यांनी कळविले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *