शेतकऱ्यांचा कापुस शासना ( सी.सी.आय ) कडून पुर्ण सरसकट खरेदी करा – नगरसेवक सुरज देसले याची मागणी

Featured धुळे
Share This:

शेतकऱ्यांचा कापुस शासना ( सी.सी.आय ) कडून पुर्ण सरसकट खरेदी करा – नगरसेवक सुरज देसले याची मागणी

धुळे(तेज समाचार प्रतिनिधि) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील जवळपास ४० ते ५० टक्के शेतकऱ्यांचा कापुस अद्याप घरात पडुन आहे.तसेच पावसाळा तोंडावर आला आहे.अवा परिस्थितीत शेतकऱ्यांकडील कापुस खरेदी न झाल्यास आधिच गांजलेला शेतकरी कोलमडून पडेल , त्यासाठी वेळेतच शासनामार्फत ( सी.सी.आय ) पुर्ण क्षमतेने कापुस खरेदी व्हावी.अद्याप ४० ते ५० टक्के शेतकऱ्यांचा कापुस घरातच पडला आहे.त्यामुळे शासनाने युध्दपातळीवर शेतकऱ्यांचा संपुर्ण कापुस ( सरसकट ) खरेदी करावा.पुढील १० दिवसात पावसाची शक्यता असल्याने खरेदी केलेला कापुस तसेच तयार झालेल्या कापसाच्या गाठी साठवणूक करण्यासाठी गोदामाची व्यवस्था योग्य पध्दतीने करावी व कापुस खरेदी केंद्रावर ग्रेडरची संख्या वाढवावी जेणे करून सी.सी.आय केंद्रावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कापुस खरेदी करता येईल.खरेदी केंद्रावर शेतकरी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी , थर्मल स्क्रीनींग करण्यासाठी प्रत्येक केंद्रावर आरोग्य कर्मचारी उपलब्ध करून द्यावा.पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असुन , कापुस विकला गेला नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल.तरी आपणास विनंती आहे की , वरील विषयाचे लवकरात लवकर नियोजन होऊन शेतकऱ्यांच्या आपेष्टा थांबवावी.अशी मागणी मा नगरसेवक सुरज देसले यांनी केली.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *