शेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली

Featured जळगाव
Share This:

शेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली.

यावल तहसील,नगरपरिषद कामकाजाकडे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांचे दुर्लक्ष.

यावल (सुरेश पाटील):यावल तहसील व यावल नगरपरिषद कार्यक्षेत्रात अनेक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेत त्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या शेती माल उत्पादना लायक असलेल्या काळ्याभोर शेतजमिनी खरेदी करणेबाबतच्या रजिस्टर सौदे पावत्या व करारनामे करून शेतकऱ्यांच्या नावानेच शेत जमिनी बिनशेती करून प्लॉट विक्री करण्याचा अवैध अनधिकृत गोरख धंदा शेतकर्‍यांच्याच माध्यमातून अनेक शेतकरी, बिल्डर,व्यापारी,शिक्षक करीत असून या प्रकरणात अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली असल्याबाबत यावल तालुका शिवसेना संस्थापक बाळासाहेब कोलते यांनी तक्रार केली आहे.परंतु या तक्रारीची दखल यावल तहसीलदार यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी न घेता,ठोस कार्यवाही न केल्याने या प्रकरणाकडे तसेच यावल तहसीलदार,व यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या कामकाजाकडे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावल तालुक्यातून केला जात आहे.
यावल तहसील व यावल नगरपरिषद हद्दीत गेल्या25ते30 वर्षाच्या कालावधीत विकासकांनी बिनशेती करण्याचे सर्व नियम नाल्या खोऱ्यात भराव टाकून दडपून टाकले आहेत तसेच संबंधित काही अनेक विकासकांनी बिनशेती केलेल्या जमिनीवर संपूर्ण सुविधा उपलब्ध करून न देता किंवा काहींनी निकृष्ट प्रतीची कागदोपत्री कामे दाखविली असताना सुद्धा प्लॉट विक्री करून टाकले आहेत यात आतापर्यंत संबंधित मुख्याधिकारी आणि महसूल विभागाने काय बघितले आणि काय कारवाई केली असे अनेक प्रश्न उपस्थित होत असले तरी त्याचे दुष्परिणाम आज अनेक हजारो नागरिकांना सहन करावे लागत आहेत.
नाशिक विभाग महसूल आयुक्त यांच्याकडे यावल तालुका शिवसेना संस्थापक बाळासाहेब कोलते यांनी दि.14 जून 2021 रोजी लेखी तक्रार केली होती आणि आहे त्या तक्रारीत म्हटले आहे की यावल शहरातील गट नं.759/1/4,गट,नं.759/1/3, गट नं.759, 735, 736, 737, 738, 739, 740, 741/1, 742 743 744 745 746 747 748 749 750 या सर्व गट नंबरचे सातबारे उतारे व कागदपत्र सोबत जोडलेले आहेत.
शेतकरी बिल्डर व व्यापारी यांनी शासनाचा अंदाजे वीस ते पंचवीस कोटीचा महसूल बुडविल्या बद्दल व शेती बिनशेती करण्याबाबतचे सर्व शासकीय नियमाचे उल्लंघन केले याबाबतच्या विषयान्वये तक्रार अर्ज केला आहे त्यानुसार महसूल आयुक्त यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी जळगाव यांनी यावल तहसीलदार यांच्या मार्फत चौकशी सुरू केली असली तरी अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही चौकशी सुरू असताना सुद्धा संबंधित विकासकांनी प्लॉट विक्री सुरू ठेवली आहे.विकासकांनी सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर आणि नाल्यामध्ये भराव टाकून अनधिकृत अतिक्रमण करून बऱ्याच ठिकाणी फुलाचे बांधकाम सुद्धा करून टाकले आहे.तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत.यातील काही कामे निकृष्ट प्रतीची तसेच काही कामे कागदोपत्री दाखविण्यात आली आहेत.विकासकांच्या या मनमानी कारभाराकडे यावल तहसीलदार,सर्कल,तलाठी यांच्यासह यावल नगरपरिषद मुख्याधिकारी आणि यावल नगरपरिषद बांधकाम शाखा अभियंता यांचे अक्षम्य हेतुपुरस्कर आणि अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने जिल्हाधिकारी जळगाव फैजपुर भाग प्रांताधिकारी यांनी लक्ष केंद्रीत करून संबंधितांनी आपल्या शासकीय कामकाजात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कार्यवाही करून विकासकांसोबत सर्व संबंधित यंत्रणेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करावी अशी मागणी संपूर्ण यावल तालुक्यातून होत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *