‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन

Featured मुंबई
Share This:

मुंबई  (तेज समाचार डेस्क): सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विवेक यांचं निधन झालं आहे. ते 59 वर्षांचे होते. शनिवारी पहाटे त्यांना कार्डिअ‍ॅक अरेस्टचा अटॅक आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

विवेक यांच्या अभिनयाचं कौतुक सर्वांनीच केलं. त्यानंतर त्यांनी अबु सांगिर, केलादी कम्मानी, तंबी पोंटाडी, तमिळ पोन्नू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. रजनीकांत यांच्या शिवाजी द बॉस या चित्रपटामुळं त्यांना बॉलिवूड चाहते देखील फॉलो करु लागले होते. विवेक हे तमिळ सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेते म्हणून ओळखले जायचे. विवेक यांचा जन्म तमिळनाडूतील एका गरीब कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळं शाळेतील स्पर्धांमध्ये भाग घेत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.

दरम्यान, विवेक यांच्या निधनामुळं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विवेक यांना जनमानसात अफाट लोकप्रियता त्यांना मिळाली होती.  विवेक यांच्या निधनामुळं चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *