‘हा’ मेसेज तुमच बॅंक अकाउंट करू शकतो खाली

Featured मुंबई
Share This:

मुंबई  (तेज समाचार डेस्क). सध्या जगात सगळीकडे ऑनलाईन पद्धतीनं व्यवहार केले जात आहे. यामुळं वेळेची बचतही होतं असल्यामुळं सर्वसामान्य लोकंही नेट बॅंकिंगकडे वळू लागली आहेत. याचसंदर्भात एक महत्वपूर्ण माहिती सायबर क्राईमच्या मुख्य कार्यालयानं ट्विटरवरुन दिली आहे. सायबर गुन्हेगार लोकांना तुमच बॅंक खात नॉमिनीसोबत जोडलं गेल आहे. तुम्ही पुढच्या 30 मिनिटात नॉमिनीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करु शकता. जर तुम्ही तसं केलं नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तक्रार दाखल करु शकता,असा मेसेज पाठवला जात आहे.

अनेक युजर्स कोणताही विचार न करता लिंकवर क्लिक करतात. त्यामुळं युजर्सच्या खात्यातून पैसे देखील चोरीला जाऊ शकतात. त्यामुळं सायबर क्राईमकडून वाचण्यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे.

जर तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही मेसेज किंवा मेसेजव्दारे लिंक आली तर तातडीने सायबर पोलिसांना याबाबत माहिती द्या, असं आवाहन सायबर क्राईमच्या गृहमंत्रालयानं जनतेला केलं आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *