
आमदारकी नाही मिळाली तरी काम करत राहणार- ऊर्मिला मातोंडकर
आमदारकी नाही मिळाली तरी काम करत राहणार- ऊर्मिला मातोंडकर
मुंबई (तेज समाचार डेस्क): विधान परिषदेची आमदारकी मिळाली नाही तरी शिवसेनेचे काम करतच राहणार आहे. कोणत्याही पदासाठी मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही, असं अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी सांगितलंय.
प्रमाणे बाॅलीवूडमध्ये लोकांनी मला स्टार बनवले त्याचप्रमाणे राजकारणात लाेकांसाठी नेता बनायचे आहे. एसी रूममध्ये बसून टि्वट करणारी नेता बनायची माझी इच्छा नाही, असं ऊर्मिला मातोंडकर म्हणाल्या. कोणत्या पदासाठी शिवसेनेत आलेली नाही. काँग्रेसमध्ये होते तेव्हाही लोकसभा उमेदवारीची अपेक्षा केली नव्हती. काँग्रेससाठी प्रचार करूनही मी समाधानी राहिले असते, असं ऊर्मिला मातोंडकर यांनी म्हटलंय.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने शिवसेनेच्या कोट्यातून ऊर्मिला मातोंडकर यांची राज्यपाल नियुक्त सदस्यत्वाची शिफारस केली आहे. यावर अद्याप राजभवनातून निर्णय आलेला नाही.