पुढील 3 दिवस अत्यंत धोक्याचे, महाराष्ट्रातील ‘या’ भागाला गंभीर इशारा

Featured मुंबई
Share This:

मुंबई  (तेज समाचार डेस्क):  राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकणासह, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि विदर्भात नागपूर-गडचिरोली, अकोला भागात पावसाने चांगलीच बॅटींग केली आहे. तसेच कोल्हापूरमधली परिस्थिती नियंत्रणात आली नाही. अशात हवामान खात्याने पुढील 3 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे राज्यासमोरील संकट वाढल्याचं दिसत आहे.

कोकणात सलग दोन दिवस अतिवृष्टी आणि जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 24 ते 27 जुलैदरम्यान रायगड, सिंधुदुर्ग ठणे पालघर या जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पुणे, कोल्हापूर, साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. पुढचे 3 ते 4 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहे. कोकण आणि गोव्यात 24 तारखेलाही हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे

मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्याचा परिसर, सातारा, पुणे, कोल्हापूर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच 27 जुलैपर्यंत मराठवाड्याच्या औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Shree
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *