
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवाढ
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवाढ.
पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील यांच्यासह राज्य शासनाचे मानले आभार.
यावल ( सुरेश पाटील): येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास सहा महिन्याची मुदत वाढ देण्यात आल्याचा आदेश राज्याच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयातून काढण्यात आला आहे. मुदतवाढ मिळणे कामी माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, आमदार सौ. लताताई सोनवणे, पालक मंत्री मा.ना.गुलाबराव पाटील यांनी शासनाकडे सततचा पाठपुरावा केल्यामुळे मुदतवाढ मिळाल्याने यावल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळातर्फे त्यांच्यासह राज्यशासनाचे आभार मानण्यात आले.
गेल्या वर्षी 8 सप्टेंबर 2020 रोजी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची मुदत संपलेली असताना संचालक मंडळास दोन टप्प्यात एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. शासनाने 10 सप्टेंबर 2020 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसंदर्भात आधी 24 सप्टेंबर2020पर्यंत निर्णय राखून ठेवला परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता17 सप्टेंबर2020 ला सहा महिने मुदत वाढ देण्यात आली होती ती मुदत वाढ मार्च 2021 मध्ये संपणार होती मात्र पुन्हा राज्यात कोरोनाचा फैलाव वाढल्याने 8 मार्च 2021 रोजी सहकार मंत्रालयातून नवीन आदेश काढण्यात आला आणि पुढील6 महिन्यासाठी मागील संचालक मंडळाला मुदत वाढ देण्यात आली आहे आता पुढील 6 महिने पुन्हा तेच संचालक मंडळ कामकाज करणार आहे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांच्या स्वाक्षरीने आदेश काढले आहेत.सध्या शिवसेनेचे मुन्ना पाटील बाजार समितीचे सभापती म्हणून कामकाज बघत आहेत या निर्णयाने संचालक मंडळात पुन्हा उत्साह निर्माण झालेला आहे.