संपूर्ण यावल शहरात विजेचा लपंडाव सुरू असतो

Featured जळगाव
Share This:

संपूर्ण यावल शहरात विजेचा लपंडाव सुरू असतो

वीज ग्राहकांमध्ये संतप्त भावना.

वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष.

यावल  ( सुरेश पाटील ):  ऐंन कोरोना विषाणुच्या महामारीत आणि संकटात दुष्काळात तेराव्या महिन्याप्रमाणे यावल शहरातील वीज पुरवठा दररोज वारंवार सतत एक, एक, दोन, दोन तासानंतर खंडित होत असल्याने संपूर्ण यावल शहरात संतप्त भावना व्यक्त करण्यात येत असून वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज वितरण कंपनीचे स्थानिक अधिकारी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याकडे यावल शहरातील विविध सामाजिक संघटना आणि लोक प्रतिनिधी सुद्धा गप्प असल्याने शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वीज वितरण कंपनीमार्फत गेल्या महिनाभरात पावसाळ्यात वादळ वाऱ्यामध्ये वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून ट्री कटिंग ( इलेक्ट्रिक तारां जवळील ठीक ठिकाणी वाढलेल्या झाडे झुडपांच्या फांद्या तोडल्या चे काम सुद्धा करण्यात आले असताना ) केली आहे,तसेच यावल शहरात आता पावतो वारा, वादळ, पाऊस जोरात झालेला नाही तरी सुद्धा आणि कमी प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात होता बरोबर वीज पुरवठा तात्काळ खंडित केला जातो.
याप्रमाणे यावल शहरात मेन रोडवर म्हसोबा देवस्थाना जवळील इलेक्ट्रिक डीपीवर पुरवठ्याचा वाजवीपेक्षा जास्त विजेचाभार / किंवा विज वापर जास्त होत असल्याने त्या परिसरासह मेन रोडवर तसेच देशमुखवाड्यात गवत बाजार परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असतो म्हणून वीज वितरण कंपनीने म्हसोबा देवस्थाना जवळील डीपी बदलवून जास्त क्षमतेची डीपी तात्काळ बसवावी अशी अशी मागणी त्या संपूर्ण परिसरातून होत आहे.
याप्रमाणे गेल्या पंधरा दिवसात संपूर्ण यावल शहरात एक, एक, दोन, दोन, तासानंतर वीज पुरवठा खंडित होत असल्याने संपूर्ण यावल शहरातील नागरिकांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे, कोणतीही पूर्वसूचना न देता वीज वितरण कंपनी वीज पुरवठा खंडित का करते ? कोरोना विषाणू च्या संचार बंदीमुळे 75 टक्के नागरिक आणि व्यवसायिक आपापल्या घरात आणि व्यवसायाच्या ठिकाणी थांबून राहत असल्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे यावल शहरातील विविध सामाजिक संघटनांनी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी वीज वितरण कंपनी स्थानिक अधिकाऱ्यांची समन्वय साधून वीज पुरवठा कायम सुरु राहणे संदर्भात तात्काळ कार्यवाही करावी असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.

Chaddha Classes

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *