यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांच्याविरोधात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा एल्गार

Featured जळगाव
Share This:

यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांच्याविरोधात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा एल्गार.

कर्मचाऱ्यांनी केला सामुदायिक तीव्र शब्दात निषेध.

यावल ( सुरेश पाटील) :यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी सफाई मुकडदम व सफाई कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने यावल नगर पालिकेतील सर्व स्त्री-पुरुष सफाई कामगारांनी दुर्गादास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यावल नगरपालिके समोर मुख्याधिकारी यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आज एल्गार पुकारला आहे.

यावल नगरपालिका नगराध्यक्षा सौ.नोंशाद तडवी, तहसीलदार यावल, पोलीस निरीक्षक यावल, यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल नगर परिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांनी दिनांक 27 ऑगस्ट 2020 गुरुवार रोजी सफाई मुकडदम व सफाई कर्मचारी यांना अपमानास्पद वागणूक दिली होती तसेच कर्मचाऱ्यांसोबत अरेरावीची ची भाषा वापरून उद्धट वागणूक दिली होती त्यामुळे यावल नगरपरिषद मध्ये कार्यरत कर्मचारी तसेच सफाई मुकडदम दुर्गादास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वाजता मुख्याधिकारी यांचा सफाई कामगारांनी काळ्या फिती लावून तीव्र शब्दात निषेध नोंदविला. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्स व मास्क वापरून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. दिलेल्या निवेदनावर मुकड़दम दुर्गादास चव्हाण, सफाई कामगार अर्जुन बारी, दरबारसिंग पाटील, अशोक चव्हाण, दिलीप वाणी, रवींद्र भोईटे, चंद्रकांत कोलते, अनिल चौधरी, राजेंद्र गायकवाड, मधुकर गजरे, सुनील उंबरकर इत्यादी कर्मचाऱ्यांची आपली स्वाक्षरी केली आहे.
याच प्रकारे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी यावल नगरपालिकेतील वरिष्ठ लिपिक पंडित देवचंद सावकारे यांना सुद्धा वैयक्तिक हेतू साध्य करणेसाठी वरिष्ठ लिपिक पदावरून काढून लेखापरीक्षणातील आशेपाची लवकरात लवकर पूर्तता करून तसा अहवाल सादर करण्याचा आदेश दिनांक 23/7/2020 रोजी पंडित सावकारे यांना दिला असल्याने मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभाराला सुद्धा यावल नगरपालिकेतील 90 टक्के कर्मचारी वैतागले आहेत. मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार यावल नगरपालिका अध्यक्षा आणि इतर नगरसेवकांना दिसून येत नाही का ? असा प्रश्न संपूर्ण यावल शहरात उपस्थित केला जात आहे. संबंधित वरिष्ठ अधिकारी यावल नगरपालिका मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या विरोधात काय कार्यवाही करतात तसेच सफाई कामगार यापुढे यावल नगरपालिकेत काय भूमिका निभावतील याकडे संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधून आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *