मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रॉनिक होमिओ पॅथी महाराष्ट्र राज्य संघटनेत जॉईंट सेक्रेटरी पदी डॉ. वासुदेव शिंपी

Featured नंदुरबार
Share This:

मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रॉनिक होमिओ पॅथी महाराष्ट्र राज्य संघटनेत जॉईंट सेक्रेटरी पदी डॉ. वासुदेव शिंपी

 

नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रॉनिकहोमिओपॅथी महाराष्ट्र राज्य संघटनेत जॉईंट सेक्रेटरी पदी डॉक्टर वासुदेव प्रल्हाद शिंपी राहणार बलवंड तालुका – जिल्हा नंदुरबार यांची निवड झाली आहे. इलेक्ट्रॉहोमिओपॅथी मेडिकल असोशिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर सतीष जगदाळे ( पुणे ) यांनी नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. त्यांनी महाराष्ट्र स्टेट कमिटीवर नंदुरबार जिल्ह्यातून डॉक्टर वासुदेव प्रल्हाद शिंपी राहणार बलवंड तालुका – जिल्हा नंदुरबार यांची निवड केली आहे. डॉक्टर वासुदेव शिंपी हे ग्रामीण भागात सेवा करीत असतात . तसेच शिंपी समाजात देखील त्यांनी विविध पदावर काम केले आहे. डॉ. वासुदेव शिंपी हे समाजकार्यात सदैव अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या निवडीबद्दल नंदूरबार जिल्ह्यातील इलेक्ट्रॉहोमिओपॅथी डॉक्टर असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रमोद चित्ते , डॉक्टर धनगर , डॉ. ढोले , डॉक्टर सतीश पाटील , डॉ. दीपक नांद्रे , डॉक्टर कलाम खांडबारा , डॉक्टर नरेंद्र पाटील ( नांद्रे ) नवापूर , डॉक्टर शैलेश महाजन , खापर तसेच धुळे येथून डॉक्टर शकील देशमुख , डॉक्टर प्रशांत सोनवणे , डॉक्टर विलास बिरारी डॉक्टर विलास बिरारीस , डॉ. विरेंद्र गिरासे यांनी डॉक्टर सतीष जगदाळे ( पुणे ) यांनी महाराष्ट्र स्टेट कमिटीवर डॉ. वासुदेव शिंपी यांची निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे . डॉ. वासुदेव शिंपी यांची निवड झाल्यामुळे नंदुरबार – धुळे जिल्ह्यातील असंख्य डॉक्टर मित्रांनी तसेच शिंपी समाजातील समाज बांधवांनी , नातेवाईक , मित्रपरिवाराने , बलवंड गावकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *