ऊर्जामंत्री ना.राऊत व शिरपूर महावितरण यांच्याकडे मागणी, वाढीव वीजबिलांची होळी, वीजबिले कमी करून जनतेला दिलासा द्यावा – भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी

Featured धुळे
Share This:

ऊर्जामंत्री ना.राऊत व शिरपूर महावितरण यांच्याकडे मागणी, वाढीव वीजबिलांची होळी, वीजबिले कमी करून जनतेला दिलासा द्यावा – भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी 

शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि मनोज भावसार): शिरपूर शहर व तालुक्यात वीज ग्राहकांना गेल्या तीन महिन्यांचे वाढीव भरमसाठ वीज बिल महावितरण कंपनीने वाटप केले असून जनतेमध्ये  असंतोष असून लवकरात  लवकर  वीजबिले  कमी करून जनतेला देण्यात यावीत अशी मागणी भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी केली. शिरपूर शहर व तालुका भाजपा  तर्फे दि. १४ जुलै रोजी  भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली येथील महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता नेमाडे यांना  निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी मंडळाच्या आवारात पक्षातर्फे वाढीव वीजबिलाची होळी करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, चिटणीस संजय आसपुरे , तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील , शहर सरचिटणीस महेंद्र पाटील , रोहित शेटे , शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, प्रशांत राजपूत, शहर चिटणीस अविनाश शिंपी, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख , युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, माजी शहर सरचिटणीस सुनील चौधरी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व वीज ग्राहक यांची प्रमुख उपस्थिती होती. निवेदनाची प्रत राज्याचे ऊर्जामंत्री ना.नितीन राऊत , विधानसभा विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस, उपकार्यकारी अभियंता दोंडाईचा, पोलीस निरीक्षक शिरपूर यांना ई-मेल द्वारे पाठविण्यात आले आहे.
यावेळी भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी म्हणाले की, कोरोना या विषाणूमुळे जगभरात पसरलेल्या महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व जनतेला मृत्युपासून वाचविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या निर्देषानुसार राज्यात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घोषित केला गेला असून या कालावधीत शेती, औद्योगीकसह राज्यातील सर्व प्रकारचे व्यवसाय ठप्प झाले. अनेकांना रोजगारापासून वंचित रहावे लागले. शेतकरी , व्यापारी, छोटे दुकानदार, फेरीवाले, मजुर, नागरीक अश्या सर्वच घटकांच्या दैनंदिन जीवनावर याचा मोठा परिणाम झाला असून आर्थिक मंदीचे सावट निर्माण झाले आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अशीच भयावह परिस्थीती निर्माण झाली आहे. लॉकडाऊन काळात जनतेला दिलासा देण्यासाठी पक्षातर्फे दि.८/६/२०२० रोजी वीज महामंडळावर (महावितरण) वीज बिल माफ करण्याचे निवेदन दिले. तरी राज्य सरकारने वीज बिल माफ केले नाही. तरी उलट वीजेचे युनिट दर हे वाढवून वीजबिलात पाठविण्यात आले असल्याचे म्हणाले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की , शिरपूर शहर व तालुक्यात वीज बिल भरण्यासाठी सक्तीचे केले जात असुन वीजेसंदर्भातील तक्रारी समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रथम मागील थकबाकी भरा अश्या प्रकारची सक्तीची व दटवण्याची भाषा वीज कर्मचारी करू लागले आहेत. लॉकडाऊन काळात विविध सवलती दिल्या असल्या तरी या तालुक्यातील व्यापार, व्यवसाय मंदीच्या अवस्थेत असून कामगार, मजूर, शेतकरी, नागरीक यांच्या हातात पैसा नाही. त्यामुळे आलेले वीजेचे वाढीव बिल भरणार नाहीत अशी जनतेचा आक्रोश बघावयास मिळत आहे. राज्य शासनाने याची दखल घेऊन आलेले वाढीव वीजबिल कमी करुन शिरपूर तालुक्यातील जनतेची घरगुती व्यावसायिक, औद्योगिक , कृषीपंपाचे वीजबिले पुर्णपणे कमी करुन वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी, शिरपूर शहर व तालुका तर्फे करण्यात आली असून मंत्री महोदयांनी शासनस्तरावरून या संदर्भातील निर्णय मागे घेवुन वीजग्राहकाडून वीजबिलाचा भरणा करण्याची सक्ती थांबवावी, त्यांच्या समस्या व तक्रारींचे विनाविलंबी निवारण केले जावे व वीज कनेक्शन कट व वसूली थांबविण्याबाबतचे आदेश वीज कंपनीला तात्काळ देण्यात यावे. या संदर्भातील जनहिताचा निर्णय लवकरात लवकर राज्य शासनाने घ्यावा अन्यथा जनसामान्यांसाठी पक्षातर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *