
विजेवर धावणार धुळ्याची पॅसेंजर गाडी
धुळे (विजय डोंगरे ): रविवारी सायंकाळी चाळीसगाव धुळे पॅसेंजर गाडी ही रेल्वे स्थानकात विजेवर धावणाऱ्या इंजिन डब्यासह धुळे रेल्वे स्थानकात दाखल झाली इंजिनातील चालक यांचे स्टेशन मास्तर सुनील महाजन यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले यावेळी उपस्थित प्रवासी यांनी टाळ्या वाजून चालक व विजेवर धावत आलेल्या गाडीला पाहून आनंद व्यक्त केला.
वीज यंत्रणेचे काम पूर्ण झाल्यानंतर पहिलीच फेरी आज सायंकाळी पॅसेंजर गाडीला पूर्ण केली. धुळे-चाळीसगाव अशा चार फेऱ्या पॅसेंजर गाडी हि वीजयंत्रणेच्या सहाय्याने ती पूर्ण करणार आहे.याअगोदर ही गाडी प्रथम कोळशाच्या इंजिन ने सुरू होती. त्यानंतर डिझेल इंजिन या गाडीला लावण्यात आले होते.अता वीजेचे इंजिन जोडून हि पॅसेंजर दररोज धावणार आहे.
पॅसेंजर गाडीला डिझेल इंजिन जोडलेले होते. एका फेरीला डिझेल इंजिन फेरी पूर्ण करण्यास चारशे लिटर डिझेल लागत असे व चार फेरीसाठी एकूण गाडीला सोळाशे लिटर डिझेल लागायचे खर्चही जास्त होता.व यामुळे प्रदूषणही जास्त होत होते आता प्रदूषण कमी होणार आहे.
साधारणता धुळे-चाळीसगाव हे अंतर हि पॅसेंजर गाडी एक तास वीस मिनिटांत विजेवर धावत पूर्ण करणार आहे.
विजेवर चालणारी पॅसेंजर गाडी धुळे ते नाशिक, धुळे ते मनमाड अशी धावली तर जास्त फायदा होईल अशी प्रतिक्रिया काही प्रवासी नागरिकांनी दिली