
भारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड
भारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी खिर्डी येथील प्रदीप महाराज यांची निवड.
यावल (सुरेश पाटील): शनिवार दि.4रोजी रावेर येथे भारतीय जनता पार्टीची तालुका बैठक आयोजित करण्यात आली यात अनेक पदाधिकाऱ्यांची त्यांच्या कार्य कुशलतेनुसार पदांवर निवड करण्यात आली यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे खिर्डी येथील तालुका संघटक प्रदीप नरेंद्र पंजाबी (महाराज)यांची भारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुख पदी निवड करण्यात आली.त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची पावती म्हणून तालुकास्तरीय प्रमुख पदाची जबाबदारी प्रदीप महाराज यांच्या कडे सोपविण्यात आली आहे.
मा.आ.गिरीषभाऊ महाजन,खा. रक्षाताई खडसे,जिल्हाअध्यक्ष राजु मामा भोळे,जि.प.अध्यक्ष रंजनाताई पाटील,सुरेशजी धनके, पद्माकर महाजन,प्रल्हादराव पाटील,नंदकिशोर महाजन, यांच्या मार्गदर्शनाने महत्वपूर्ण जबाबदारी तालुका अध्यक्ष राजन लासूरकर यांनी प्रदीप महाराज यांच्या वर सोपविली आहे.त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या वर तालुकाभरातून सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.