
जळोद आश्रमशाळेचा शैक्षणिक उपक्रम
जळोद आश्रमशाळेचा शैक्षणिक उपक्रम
शिरपूर (तेज़ समाचार प्रतिनिधि ) : कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने इयत्ता 1 ली ते 9 वी पर्यंतच्या विध्यार्थ्यांच्या व्दितीय सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेवुन लॉकडाऊन कालावधीत राज्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे. लॉकडाऊनची पारिस्थिती अनिश्चित असल्यामूळे खा.क.स्व. स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी, शिरपूर जि. धुळे या संस्थेच्या जळोद ता. शिरपूर येथील प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांनी पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेशीत विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व विध्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून रहावेत म्हणून मा. श्री राजाराम हाडपे सो, प्रकल्प अधिकारी, एकत्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राथमिक मुख्याध्यापक श्री एस.ए.मंडलिक व माध्यमिक मुख्याध्यापक श्री एस.एस.जमादार यांच्या नियंत्रणाखाली इयत्ता 1ली ते 10 वी च्या विध्यार्थ्यांचे वर्ग व तुकडीनिहाय व्हाट्सअप ग्रुप तयार केलेले असुन व्हाट्सअपच्या माध्यमातून संदेश पाठवून विध्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम शिकविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. तसेच या माध्यमातून विध्यार्थांना दररोज गृहपाठ देवुन विध्यार्थ्यांची शैक्षणिक तयारी करुन घेतली जात आहे. शैक्षणिक गाणी, गोष्टी, शैक्षणिक व्हिडिओ- आडीओ, मार्गदर्शनपर फोटो, टेम्प्लेट, मिडमैप, पझीस इत्यादी अनेक प्रकारची शैक्षणिक माहिती विध्यार्थ्यांपर्यंत व्हाट्सअपच्या माध्यमातून पोहोचविली जात आहे. तसेच कोविड- 19 च्या प्रादुर्भावाविषयी माहिती व सावधगिरीच्या उपाययोजनांचे संदेश देण्यात येत आहेत. या उपक्रमाला विध्यार्थी व पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त अॅड. प्रविणसिंग पाटील यांनी दिली आहे.
या उपक्रमाव्दारे शिक्षणाची गंगा आदिवासी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी भगिरथ प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाषसिंह जमादार, सचिव श्री कल्पेशसिंह राजपूत यांनी कौतुक केले आहे.