
वर्धा जिल्ह्यातील काही गावांना भूकंपाचे हादरे
वर्धा (तेज समाचार डेस्क): वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट तालुक्यातील काही गावांमध्ये बुधवारी दुपारी भूकंपाचे सौम्य हादरे बसले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली होती. रिश्टर स्केलवर हा भूकंप 2.8 इतका नोंदवण्यात आला.
यासंदर्भातील माहितीनुसार हिंगणघाट तालुक्यातील कानगाव, कोसुर्ला (मोठा), कोसुर्ला (लहान), भैयापूर, डोलापूर, मोझरी या गावांमध्ये आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.8 इतकी नोंदवली गेली. भूकंपाचे हादरे बसल्यानं नागरिक भयभीत झाले होते. अचानक हादरे जाणवू लागल्याने आणि आवाज येत असल्याने नागरिक घाबरले. भूकंपाची तीव्रता कमी असल्यानं कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेले नाही.