Skip to content
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पू.सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत रविवार रोजी देशाला संबोधित करणार आहे.
‘वर्तमान परिस्थिती व आपली भूमिका’ या विषयावर बोलण्यासाठी सायंकाळी 5.00 डॉ. मोहनजी भागवत ऑनलाईन येणार आहेत. देशात सर्वत्र लॉकडाऊन आहे.
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहेत. जगात हजारोंच्या संख्येने लोक मृत्युमुखी पडले आहेत.
अश्या परिस्थितीत आपली काय भूमिका असावी याविषयी रा.स्व. संघाच्या अधिकृत युट्यूब व फेसबुकवरून सरसंघचालक ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.
त्यासाठी facebook.com/rssorg आणि youtube.com/RSSOrg या संकेतस्थळाला भेट देऊन सगळ्यांनी सहकुटुंब हे बौद्धिक ऐकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.