धुळे: क्रुझर च्या धडकेत मोटरसायकल स्वार गंभीर

Featured धुळे
Share This:
धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधी) : धुळे येथील चाळीसगाव रोडवर क्रुझर व मोटरसायकल यांच्यात झालेल्या धडकेत दोन जण गंभीर.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान शहरातील चाळीसगाव रोड मार्गाने मोटरसायकल क्रमांक
M H18 AN 6521 ने जामचा मळा 100 फुटी रस्त्यावरून दोघे भाऊ बहीण गावात काही खरेदीसाठी यायला निघाले होते याच दरम्यान महामार्गावरून चाळीसगाव रोड मार्गाने एक क्रूजर गाडी क्रमांक M H18AN 6521 हि सुद्धा शहरात येत असताना या गाडीने गीता जिनिंग समोरील रस्त्यावरती मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्याने मोटरसायकल वरील दोघे भाऊ बहीण जोरदारपणे रस्त्यावर फेकले गेले व गंभीर जखमी झाले यानंतर क्रूजर गाडी चालक घटनास्थळावरून फरार होऊन गेला त्याला काहीजणांनी कबीर पुतळा परिसरात पाटला करून पकडले व आजादनगर पोलिसांच्या हवाली केले यावेळी गाडी चालक दारूच्या नशेत होता दोघे जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे यामुळे काही वेळ चाळीसगाव रोड वरील वाहतूक कोंडी झाली होती .
जखमीची ओळख पटली असून त्यांची नावे 1)आरिफ़ अजीज शाह 20 आणि बहिण 2) सबरुन्निसा अजीज शाह 18 गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताबाबत चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *