
दोंडाईचा येथे लॉक लॉकडाउन पिरीयड मध्ये पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर पत्रकाराचीच गाडी चोरीला
दोंडाईचा (तेज समाचार प्रतिनिधि): येथे मागील एकत्तीस दिवसांपासून कोरोना विषाणूंच्या खबरदारीवर पोलीसांमार्फत लॉकडाउन पिरीयड कडेकोट पाळला जात आहे. मात्र या कडेकोट बंदोबस्तातही पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या “जनमतचे” संपादक दौलत लक्ष्मण सुर्यवंशी यांच्या घराजवळून त्यांची हिरो कंपनीची सुपर स्प्लेंडर गाडी क्रमांक एम. एच. १८ ए. एच. ७९५३ ही पन्नास हजार रुपये किंमतीची गाडी आज पाहटे चोरीला गेली असून पोलीसांना हे एकप्रकारे चोरांनी लाॅकडाऊन चैलेंज केले आहे. ह्या चोरीसह शहरात इतर ठिकाणीही चोरी झाली असुन पोलिसांनी लवकरात लवकर तपास लावावा अशी मागणी शहरातून जोर धरत आहे.
दोंडाईचा शहरात मागील एकत्तीस दिवसांपासून कोरोना विषाणूंच्या खबरदारीवर पोलीस व प्रशासनातर्फे लॉकडाउन नियम तंतोतंत पाळले जात आहे. पण श्रमिक व हातावर काम करणाऱ्या लोकांना रोजगार नसल्यामुळे परिस्थिती खालावत आहे. त्यातच ज्यांना दैनंदिन चोऱ्या चपाट्या मारत जीवन जगायची सवय आहे, अशा लोकांनी डोकेवर काढत लाॅकडाऊन पिरीयडचा फायदा घेत आहे. पोलीस दिवसभर गावात बंदोबस्त देत असल्यामुळे रात्री चोरटे त्यांची नजर चुकवून गावात चोर्या करायचा सपाटा लावला आहे. म्हणून चोरांनी मागील आठवडय़ात शहरात धुमाकूळ घालत, दि. ११ रोजी अहिल्याबाई शॉपिंग मधील मातोश्री इंटरप्राईजेस या बेटरीच्या दुकानातून आठ हजार नऊशे रुपये रोख, सीसीटीव्हीचे रोटर, जीवो सीम तसेच निलेश बियर बार येथे हजारो रुपयाचे दारु चोरट्यांनी चोरून नेली व दुकानांचे नुकसान केले. याबाबत दोंडाईचा पोलीसांना सी. सी. टी. व्ही. फुटेज ऊपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र अजुन गुन्हा दाखल होण्याची प्रोसेस सुरू झाली नाही आहे. म्हणून चोरटे गावातच मोकळे फिरत आहेत. त्यानंतर दि. २० रोजी उज्वला मंडपवाल्यांची काळ्या रंगाची पल्सर गाडी व आज दि. २२ रोजी पहाटे दोन वाजेनंतर पोलीस स्टेशनच्या मागेच शंभर मीटरच्या आतीलच “जनमतचे” संपादक दौलत लक्ष्मण सुर्यवंशी यांचे घर आहे त्या घराजवळून आज पहाटे दोन वाजेनंतर हिरो कंपनीची सुपर स्प्लेंडर गाडी क्रमांक एम. एच. १८ ए. एच. ७९५३ पन्नास हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली आहे. हे एकप्रकारे पोलिसांना चोरांनी लाॅकडाऊन चैलेंज केले असून सध्या गावातील दोन पत्रकारांच्याकडे चोरी झाली असून गावात एवढ्या कडेकोट बंदोबस्तात पत्रकारांच्या वस्तु, दुकाने सुरक्षीत नसतील तर सर्व सामान्य लोकांचे काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो. म्हणून आता पोलीस या चोरीला गेलेल्या गाडीचा छडा किती दिवसांत लावतात याकडे दोंडाईचाकरांचे लक्ष लागून आहे