कोरोना च्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना घरात बसून होते – विजय चौधरी

Featured नंदुरबार
Share This:

कोरोना च्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना घरात बसून होते – विजय चौधरी 

नंदुरबार (वैभव करवंदकर ) :  भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले कि , काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना यांचे नेते कार्यकर्ते कोरोनाचा काळात घरात बसून होते. त्याकाळात भारतीय जनता पार्टीच्या नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपला जीव धोक्यात घालून ” सेवा ही संगठन है ” हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा मूलमंत्र उराशी बाळगून कोरोना महामारीच्या काळात सेवा देण्याचे काम करीत होते.  याप्रसंगी सेवाभावाची प्रचिती या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस निलेश माळी , जिल्हा सरचिटणी राजेंद्र गावीत तसेच ह्या पत्रकार परिषदेत लोक वाहिनी न्यूज चे संचालक विशाल माळी यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सरचिटणीसपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकार रविंद्र चव्हाण , जगदिश ठाकुर , दिनेश गवळी , जगदिश सोनवणे यांची निवड झाल्याबद्दल भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी व भा.ज.पा. जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी. यांनी सत्कार केला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  चौधरी म्हणाले की , जगभरात कोरोना महामारी थैमान घातले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा शाखेच्या कार्यकर्त्यांनी संकटग्रस्त जनतेला आधार देण्याचे महत्त्वपूर्ण काम संपूर्ण जिल्ह्यात केले. सेवा कार्याच्या माध्यमातून वंचित , गरीब , दुर्लक्षित घटकांना अन्नदान , 42200 शिधावाटप करण्यात आले. 44,000 फेसमास्क चे वाटप केले. सॅनिटायझर वाटप , जंतुनाशक फवारणी , पी.एम. केअरा फंडामध्ये नंदुरबार जिल्हा भाजपा कार्यकर्त्यांनी 20 लाख 18 हजार 318 रुपये दिले. प्रवासी मजूर व अन्य जनतेला त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचविले. सेवाकार्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी समर्पण वृत्तीने काम केले . कोरोना महामारी च्या संकट समयी जिल्हावासीयांना आधार देणारा एकमेव पक्ष म्हणून जनतेने भाजपाकडे पाहिले. नंदुरबार , नवापूर , अक्कलकुवा , धडगाव , तळोदा , शहादा या भागातील कार्यकर्त्यांनी व्यापक स्वरूपात नागरिकांना सर्वोतोपरी सहकार्य केले. उपाशी पोटाला अन्न , बेरोजगाराला काम , निराधारांना आधार देण्याचे काम करीत असताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा देशासाठी काम करतो हे नंदुरबार जिल्हा वासियांनी अनुभवले. आपल्यालाही या महामारीची बाधा होईल याची भीती न बाळगता आपल्या जिल्ह्यातील नागरिक अडचणीत आहेत. या काळात जनतेला सहकार्य केले पाहिजे. शेतकरी , व्यापारी , दुकानदार , मजूर वर्ग , प्रवासी, नाभिक समाज , डॉक्टर , हॉटेल व्यवसायिक , पानटपरीधारक या सगळ्यांना व्यापक सहकार्य करण्यात आली. सेवा कार्यासोबत सार्वजनिक हिताचे देखील व्यापक सेवाकार्य झाले. प्रशासनाशी संपर्क आणि समन्वयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न देखील मार्गी लागले. यात जनतेचे सहकार्य देखील लाभली या महामारीच्या कठीण काळात भारतीय जनता पार्टी जिल्हा नंदुरबार ने केलेले कार्य जनतेच्या स्मरणात राहील. यापुढे ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते जनते सोबत राहतील.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *