शेतकरी असल्याचा पुरावा नसल्यामुळे मनुदेवी सेवा प्रतिष्ठाने खरेदी केलेली शेत जमीन तात्काळ सरकार जमा करण्याबाबतचे लाक्षणिक उपोषण तात्पुरते स्थगित

Featured जळगाव
Share This:

शेतकरी असल्याचा पुरावा नसल्यामुळे मनुदेवी सेवा प्रतिष्ठाने खरेदी केलेली शेत जमीन तात्काळ सरकार जमा करण्याबाबतचे लाक्षणिक उपोषण तात्पुरते स्थगित.

यावल (सुरेश पाटील): संपूर्ण खान्देशात प्रसिद्ध असलेल्या यावल तालुक्यातील श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठान यांनी शेतकरी किंवा शेतमजूर असल्याचा पुरावा शेती खरेदी करताना न दिल्यामुळे खरेदी केलेली शेतजमीन तात्काळ शासन जमा करण्यात यावी यासाठी संत श्री बाबा महाहंसजी महाराज यांनी आज मंगळवार दि.31ऑगस्ट2021रोजी यावल येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर ध्वनिक्षेपण यंत्राने घोषणा करीत व फलकांनी निषेध निदर्शने करीत लाक्षणिक उपोषण करणेबाबत लेखी निवेदन दिले होते या निवेदनाची दखल घेत यावल तहसीलदार यांनी संबंधित मंडळ अधिकारी यांचेकडून अहवाल मागविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याने चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने संत श्री बाबा महाहंसजी महाराज यांनी आजचे उपोषण स्थगित केले आहे.
संत श्री बाबा महाहंसजी महाराज यांनी दि.16ऑगस्ट 2021रोजी यावल तहसीलदार व यावल पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठान जळगाव यांनी यावल तालुक्यातील आडगाव शिवारातील शेत गट नंबर284/अ/2चे क्षेत्र हे.1.54आर ही शेतजमीन 45 लाख रुपयास दि. 19/11/2019रोजी यावल येथील दुय्यम निबंधक श्रेणी-1 यांच्या कार्यालयात नोंदणी करून खरेदी केलेली आहे.(तत्कालीन दुय्यम निबंधकास श्री मनुदेवी प्रतिष्ठानने मनुदेवीच्याच साक्षीने लाच दिल्यामुळे त्या दुय्यम निबंधककाने शेतकरी पुरावा नसतानासुद्धा दस्त नोंदणी केली कशी याबाबत मोठा कायदेशीर प्रश्न उपस्थित होत होत असल्याची संपूर्ण यावल तालुक्यात चर्चा आहे)तिचा फेरफार क्रमांक 5153 असा आहे सदर नोंद अद्याप प्रलंबित आहे कारण की सदर शेत खरेदी करणारे प्रतिष्ठान हे नियमानुसार शेतकरी नाही.(त्यांच्याकडे शेतकरी असल्याचा किंवा शेतमजूर असल्याचा पुरावा नाही) त्याबाबत तलाठी कार्यालय आडगाव मंडळ अधिकारी कार्यालय किनगाव यांच्याकडून आपल्या कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.
कायद्यानुसार शेतकऱ्यालाच शेत जमीन खरेदी करण्याचा अधिकार आहे याची जाणीव सदर शेत खरेदी व्यवहार करणारे प्रतिष्ठान अध्यक्ष तथा निलंबित पोलीस पाटील शांताराम राजाराम पाटील यांना असताना श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठान नावाने शेत जमीन खरेदी केली कशी? प्रतिष्ठानने शेतजमीन नसताना प्रतिष्ठान च्या नावाने 45 लाख रुपयाचा म्हणजे सुमारे अर्धा कोटी रुपयाचा शेती खरेदीचा व्यवहार करणे म्हणजे एक प्रकारे सदर प्रतिष्ठानला धार्मिक प्रयोजनासाठी भाविकांनी श्रद्धेने दान दक्षणा देणगी स्वरुपात दिलेल्या सार्वजनिक मालमत्तेचा अपहार आहे.
सार्वजनिक पैशातून घेतलेली सदर शेतजमीन सुद्धा सार्वजनिक आहे तिच्या खरेदी व्यवहारांमध्ये नियम व अटी शर्ती चे उल्लंघन झाले असल्याने व्यवहारावर तीव्र हरकत आहे म्हणून प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा निलंबित पोलीस पाटील यांना कुठल्याही वाटीची संधी न देता सदर शेतजमीन तात्काळ सरकार जमा करणे अत्यावश्यक आहे अशा मागणीसाठी संत श्री बाबा महाहंसजी महाराज यांनी यावल तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आचा इशारा दिला होता परंतु यावल तहसीलदार यांनी कार्यवाही चे आश्वासन दिल्याने तूर्त उपोषण स्थगित करण्यात आले आहे यामुळे यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून ज्यांनी शेतकरी किंवा शेतमजूर असल्याचा पुरावा नसताना शेत जमीन खरेदी केलेली आहे आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी अशा गैर कायदेशीर कृत्यास सहकार्य केले आहे त्यांचा सुद्धा कायदेशीर घड़ा भरण्याच्या मार्गावर आहे. असे यावल तालुक्यात संपूर्ण जळगाव जिल्ह्यात महसूल क्षेत्रात बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *