
डॉ.सुभाष भामरे यांनी महापालिकेची करोना विषाणू प्रतिबंधनात्मक कार्यवाही बाबत आढावा बैठक
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि ): खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी महापालिकेची करोना विषाणू प्रतिबंधनात्मक कार्यवाही बाबत काल दि.२८-०३-२०२० रोजी दुपारी ४ वाजता आढावा बैठक घेतली. ह्या बैठकीत महापौर मा.श्री.चंद्रकांत सोनार व भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल व उपायुक्त मा.श्री.गिरि साहेब व आरोग्य अधिकारी उपस्थित होते व त्याचा सारांश खालील प्रमाणे ह्या बैठकीत आरोग्य विभागाला व उपआयुक्तांचा महत्वाच्या सूचना देण्यात आल्या
त्या संदर्भात धुळे शहरातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक संघटना जसे IMA निमा, होमिओपॅथीक डॉक्टर असोसिएशन यांच्या बैठका घेऊन त्यांना शासकीय मार्गदर्शन तत्वाच्या तसेच करोना वायरस यांच्या संदर्भात माहितीच्या सूचना देण्यात आल्या
तसेच महत्त्वाचे वाहने, डॉक्टरांनी आपला दवाखाना सुरु ठेवला आहे व काही डॉक्टरांनी दवाखाना बंद ठेवला आहे तरी त्या सगळ्या डॉक्टरांना आवाहन करण्यात येते कि त्यांनी आपला दवाखाना सुरु ठेवावा.
· महत्वाच्या चौकामध्ये कोरोना व्हायरस संदर्भात शासकीय मार्गदर्शनात्मक सुचणे नुसार बॅनर तसेच होर्डिंग लावण्यात यावे.
· मंदिर,मशीद,गुरुद्वारा,चर्च मधील धर्मगुरू यांची बैठक घेऊन करोना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले गर्दी होऊ नये तसेच बंद ठेवण्याचे नियोजन केले होते.
· टोल, कारागृह व इतर ठिकाणी Non Contact Infrared Thermameter Machin द्वारे तपासणी अनेक ठिकाणी केली गेली.
· धुळे महापालिकेकडून ०३ एरोसाल स्र्पिंकलर व दोन सरफेस स्प्रिंकल गाड्या घेण्यात आल्या असून त्यांच्या माध्यमातून 5% सोडियम क्लोराईड या जंतुनाशकाची फवारणी नागरिकांच्या वर्दळ असलेल्या ठिकाणी तसेच बाजारपेठ, दुकाने, रस्ते या ठिकाणी करण्यात आली ह्या ठिकाणी एकशे पंचविश कर्मचारी कार्यरत होते. स्वच्छता निरीक्षक व मलेरिया कर्मचारी यांच्या निरीक्षणा खाली स्प्रिंकलर द्वारे फवारणी करण्यात येत आहे.
· सरफेस स्प्रिंकल च्या माध्यमातून कारागृह एसपी ऑफिस बस स्टॅन्ड,कोर्ट,मुख्य बाजारपेठ, जुनी व नवी महापालिका इमारत, इदगाह मैदान अश्या ठिकाणी फवारणी करण्यात अली .
· परदेशातून व मुंबई – पुणे अश्या प्रादुर्भाव असलेल्या धुळे महापालिका कार्यक्षेत्रात आलेल्या नागरिकांनी संबधित कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी नमुन्यातील सविस्तर माहिती घेऊन होम कॉरनटाईन बद्दल निर्णय घेत असतात व त्यांच्या डाव्या हातावर होम कॉरनटाईनचा शिक्का मारून घरी एका स्वतंत्र खोलीतच राहणे बाबत नोटीस देण्यात येत आहे. व एक प्रत जवळील पोलिस स्टेशनला देण्यात येत आहे.
· त्याच प्रमाणे महापालिकेला संपूर्ण शहराच्या सर्वे करण्याचा निर्देश दिला आहे. एका टीम मध्ये ३ लोक असतील ते प्रत्येक घरात जाऊन तिथे खोकला व ताप ह्याचा कोणी रुग्ण आहे का ती माहिती घेतली जाईल व त्या रुग्णाची screening केले जाईल.
आजपर्यंत धुळे शहरात १८० नागरिकांना होम कॉरनटाईन करण्यात आले. त्या पैकी परदेशातून आलेले नागरिक १५ आहेत विविध राज्यातून आलेले नागरिक १६५ आहेत.