डॉक्टर साहेब आपण अशा लोकांसाठी येतात हे चूक आहे-पोलीस निरीक्षक यांचे समाजसेवकला उत्तर

Featured जळगाव
Share This:

डॉक्टर साहेब आपण अशा लोकांसाठी येतात हे चूक आहे.

पोलीस निरीक्षक यांचे समाजसेवकला उत्तर.

अवैध धंदेवाल्यांचे काय अनेक प्रश्न उपस्थित.

यावल (सुरेश पाटील): यावल फैजपूर रोडवर असलेल्या पेट्रोल पंपासमोर हरिओम नगर जवळ एक फैजपूर येथील कार्यकर्ता रात्रीच्या वेळेस रस्त्याच्या बाजूला उभा असताना मद्यप्राशन केले आहे किंवा नाही या कारणावरून यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी त्या तरुणास पकडून यावल पोलीस स्टेशनला आणून मारहाण चौकशी केली असता झालेल्या घटनेसंदर्भात आणि वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी यावल येथील डॉ.कुंदन फेगडे रात्री 12 वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनला गेले असता पोलीस निरीक्षक म्हणाले डॉक्टर साहेब आपण अशा लोकांसाठी येतात हे चूक आहे असे बोलून पोलीस निरीक्षक पाटील स्वत: व आपले पोलीस रात्रीच्या वेळेस अवैध धंदे करणार्‍यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची जाणीव करून दिली. घटना आठ दिवसापूर्वी ची असली तरी या घटने बाबत व्हाट्सअप वरून यावल पोलिसांबाबत अवैध धंद्यां बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यावल पोलीस स्टेशन पासून100 ते150 फूट अंतरावर दिवसा व रात्री अंधारात तसेच सातोद रोड,चोपडा रोड,फैजपुर रोड,बोरावल रोड,मिनीडोर रिक्षा स्टॉप जवळ,आणि एसटी स्टँड परिसरात तसेच यावल शहरातील बाहेरील सर्व विकसित कॉलन्यामध्ये आणि यावल शहरात गल्लीबोळात मेन रोडवर चौकाचौकात अवैध धंदेवाले आणि रिकामटेकड्या मद्यपींची सामुदायिक रीत्या बैठक आणि चर्चा होत असते त्यात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याकडे मात्र यावल पोलिसांचे दुर्लक्ष असून कारवाई शून्य आहे जागोजागी लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये अवैध धंदे करणाऱ्यांची व वाहने दिसून येत नसल्याने तसेच कारवाई होत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.एखादा समाज सेवक डॉक्टर कधीतरी आपल्या समर्थक कार्यकर्त्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्यास अशा लोकांसाठी येतात हे चूक आहे असे उत्तर दिले जात असून मग पोलीस स्टेशन हे काय फक्त अवैध धंदे चालकांसाठी येण्याजाण्याचे माहेरघर आहे का? असा प्रश्न यावल शहरात उपस्थित केला जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *