
गुटख्याचे मुळासकट उच्चाटन व्हायला हवे – डॉ. प्रतापराव दिघावकर
🌹 नंदुरबार – (वैभव करवंदकर) तरूण व्यसनाधीन होत चालले आहे. गुटखा दारूच्या आहरी जात असल्यामुळे गुटख्याची तस्करी तसेच दारूची तस्करी करणाऱ्या व्यापारी यांच्या मुळासकट उच्चाटन व्हायला हवे ते आम्ही करणार आहोत असे डॉक्टर प्रतापराव दिघावकर , विशेष पोलीस महानिरीक्षक , परीक्षेत्र नाशिक हे नंदुरबार जिल्ह्यात यात आढावा घेण्यासाठी आले असताना त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. याप्रसंगी नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित , अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी , गु.अ.श.पोलिस निरीक्षक किशोर नवळे आदी उपस्थित होते.
विशेष पोलीस महानिरीक्षक , डॉ.प्रतापराव दिघावकर म्हणाले की , शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांनी फसवणूक केली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून आतापर्यंत 41 शेतकऱ्यांनी गुन्हे नोंदविले आहे. त्यापैकी 37 शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी त्यांची रक्कम परत केली आहे. तसेच तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून ज्यांनी पैसे घेतले आहेत.
त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून लवकरात लवकर अशा फसवणूक करणाऱ्यांना अद्दल घडवणार आहेत. “माझे कुटुंब , माझी जबाबदारी” असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले कोरोना विषाणूच्या विरोधात लढत असताना संपूर्ण देशात अनलॉक ची पक्रिया सुरू झालीआहे त्यामुळे पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांनी आवाहन केले आहे की , प्रत्येकाने तोंडाला मास लावणे. सामाजिक दुरी ठेवणे यांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. पत्रकार परिषदेत माहिती दिली.